शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

रशियाचा क्रूरतेचा कळस! कीव्हमध्ये पुन्हा सापडली सामूहिक कबर, तब्बल ९०० मृतदेह बाहेर काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 15:18 IST

युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये ९०० मृतदेह असलेली आणखी एक सामूहिक कबर सापडली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

कीव्ह- 

युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये ९०० मृतदेह असलेली आणखी एक सामूहिक कबर सापडली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी याबाबतची माहिती दिली आहे. शुक्रवारी पोलंडमधील मीडियाला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्राध्यक्ष म्हणाले की ज्या भागात मृतदेह सापडले तो भाग मार्चमध्ये रशियन सैन्यानं ताब्यात घेतला होता. असं वृत्त ऑनलाइन न्यूज पोर्टल युक्रेन्स्का प्रवदाने दिले आहे. "किती लोक मारले गेले हे कोणालाच माहीत नाही", असंही झेलेन्सी म्हणाले आहेत. 

झेलेन्स्की यांनी याप्रकरणाची चौकशी केली जाईल. त्यानंतर गणना देखील होईल. ही सगळी माणसं शोधायची आहेत पण ते किती लोक आहेत हेही कळत नाही, असंही ते म्हणाले. २४ फेब्रुवारीला लढाई सुरू झाल्यापासून सुमारे पाच लाख युक्रेनियन लोकांना बेकायदेशीरपणे रशियाला पाठवण्यात आल्याचा दावाही झेलेन्स्की यांनी केला आहे. "युक्रेनियन अभियोक्ता आणि कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी युक्रेनच्या नागरिकांविरुद्ध केलेल्या गुन्ह्यांशी संबंधित असलेल्या सर्व रशियन सैनिकांना शोधून त्यांच्यावर खटला चालवतील", असंही झेलेन्स्की म्हणाले. 

10 रशियन सैनिकांनी युक्रेनियन लोकांचा छळ करून त्यांना ठार मारलेदरम्यान, युक्रेननं बुचा येथे युक्रेनियन लोकांचा छळ करून त्यांना ठार करणार्‍या १० रशियन सैनिकांची ओळख पटवली आहे, असे ऑनलाइन न्यूज पोर्टल युक्रेन्स्कानं वृत्त प्रसिद्ध केले आहे. बुचाचे महापौर अनातोली फेडोरुक यांनी २३ एप्रिल रोजी घोषणा केली की रशियन सैन्याने मारलेले ४१२ नागरिक कीव्ह शहरापासून ३१ किमी अंतरावर सामूहिक कबरींमध्ये सापडले आहेत. कीव्ह प्रदेशातील सामूहिक कबरींमध्ये तपासकर्त्यांना आतापर्यंत सुमारे १,१०० मृतदेह सापडले आहेत.

मारियुपोलच्या बाहेरील प्रदेशात ३ सामूहिक कबरीमारियुपोल शहराच्या बाहेर तीन सामूहिक कबरी देखील सापडल्या आहेत, ज्यात हजारो नागरिकांचे मृतदेह आहेत. यापूर्वी असे वृत्त आले होते की पुतिन यांनी सुमारे ५ लाख युक्रेनियन नागरिकांना रशियाच्या दुर्गम भागात कैद केले आहे. पुतिन यांना युद्धग्रस्त देशावर आपले नियंत्रण मजबूत करायचे आहे, हे यातून दिसून येते. युक्रेनचे युनायटेड नेशन्सचे स्थायी प्रतिनिधी सेर्गी किस्लियस यांच्या म्हणण्यानुसार, १ लाख २१ हजार मुलांसह ५ लाख युक्रेनियन लोकांना "जबरदस्तीने" रशियाला पाठवण्यात आले आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धVladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशिया