शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेनच्या नागरिकांनी केक देऊन आणि दारू पाजून मारले रशियन सैनिक; अनेक जण रुग्णालयात! तुमचा विश्वास बसणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 19:33 IST

गेल्या अनेक दिवसांपासून रशियन सैनिक 50 हजार लोकसंख्येच्या इझियमवर बॉम्बिंग करत आहेत.

कीव - गेल्या पाच आठवड्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध थांबण्याचे नाव नाही. या दरम्यान दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्याही कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत. रशियन लढाऊ विमाने युक्रेनवर बॉम्बिंग करत आहेत. यातच, एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रशियन सैनिकांना धडा शिकविण्यासाठी युक्रेनमधील नागरिकांनी अत्यंत खतरनाक पद्धत अवलंबली आहे. येथील नागरिकांनी रशियन सैनिकांना केकमधून विष देऊन बदला घेतला आहे. 

'द मिरर'ने दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनच्या नागरिकांनी रशियन सैनिकांना केक आणि वाईनमधून विष देऊन ठार केले आहे, असा खुलासा खुद्द युक्रेनच्याच गुप्तचर संस्थेने केला आहे. खार्किव्हजवळील इझियममध्ये नागरिक रशियन सैनिकांविरुद्ध लढत आहेत. रशियन सैन्याने या शहराचा मोठा परिसर उद्ध्वस्त केला आहे.

जगण्यासाठी संघर्ष करतायत रशियन सैनिक -युक्रेनच्या संरक्षण गुप्तचर संचालनालयाने दावा केला आहे, की स्थानिकांनी तिसऱ्या रशियन मोटर रायफल डिव्हिजनसाठी केक बेक केला होता. यात त्यांना विष देण्यात आले. परिणामी, दोन रशियन सैनिकांचा मृत्यू झाला तर 28 जण डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. एवढेच नाही तर, बनावट मद्य प्यायल्याने 500 सैनिक रुग्णालयात दाखल आहेत, असा दावाही केला जात आहे.

रशियन सैनिकांचे सामान्य नागरिकांवर हल्ले - गेल्या अनेक दिवसांपासून रशियन सैनिक 50 हजार लोकसंख्येच्या इझियमवर बॉम्बिंग करत आहेत. येथील शाळा उद्ध्वस्त झाल्या आहेत, रुग्णालये ओसाड झाली आहेत. या हल्ल्यात अनेक घरेही उद्ध्वस्त झाली आहेत. युक्रेनमधील हृशुवाखा गावातील मायकोला शापोश्निक यांनी स्काय न्यूजला सांगितले की रशियन विमाने अत्यंत कमी उंचीवर उडत आहेत आणि बॉम्बफेक करत आहेत. ते म्हणाले की, रशियन सैनिक सामान्य नागरिकांना लक्ष करत आहेत.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाSoldierसैनिकwarयुद्ध