शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला! बायडन यांच्या वक्तव्यानं रशियाचा संताप, अमेरिकन राजदूताला बोलावणं धाडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 22:41 IST

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजूनही सुरूच आहे. युक्रेनवरील हल्ल्यामुळे देशातील कीव्ह, खारकिव्ह आणि मारियूपोल शहरांमध्ये नुसते उद्ध्वस्त झालेल्या इमारतींचे ढिगारेच्या ढिगारे पाहायला मिळत आहेत.

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजूनही सुरूच आहे. युक्रेनवरील हल्ल्यामुळे देशातील कीव्ह, खारकिव्ह आणि मारियूपोल शहरांमध्ये नुसते उद्ध्वस्त झालेल्या इमारतींचे ढिगारेच्या ढिगारे पाहायला मिळत आहेत. याचवेळी सर्वात मोठा प्रश्न हा आहे की रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा अंतिम परिणाम काय होईल? दरम्यान, अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंधही बिघडले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्याबाबत रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या राजदूताला बोलावणं धाडलं आहे. बायडन यांच्यामुळे रशिया-अमेरिका संबंध तुटण्याच्या मार्गावर असल्याचं रशियाकडून सांगण्यात आलं आहे.

युद्धाला 26 दिवस झाले आहेत आणि युक्रेनवर कब्जा करण्यासाठी रशियन सैन्यानं आता हायपरसॉनिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे रशियन सैन्याची आक्रमकता दिवसेंदिवस तीव्र होत आहे, तर दुसरीकडे युक्रेनचे अध्यक्ष जेलेन्स्की यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे. पुतिन यांच्याशी चर्चेसोबतच जेलेन्स्की यांनी हे संकेतही दिले आहेत की, त्यात अपयश आल्यास तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होऊ शकते.

इतिहासाची पानं उलटून पाहिली तर पहिलं आणि दुसरं महायुद्ध ज्यामुळे झालं तीच परिस्थिती युक्रेन युद्धादरम्यान निर्माण होत असल्याचं दिसून येत आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेलं युद्ध कोणत्याही क्षणी संपूर्ण जगाला वेठीस धरू शकतं. 

संपूर्ण जगाची दोन गटांत विभागणीयुक्रेननं शस्त्र टाकण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे आणि २४ फेब्रुवारीपासून सुरू असलेलं युद्ध अजूनही सुरूच आहे. युक्रेन मोठ्या हिमतीनं रशियाचा सामना करत आहे. सध्याची परिस्थिती पाहिली तर पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धांसारख्या दोन गटात जगाची विभागणी झाली आहे. एकीकडे पाश्चिमात्य देश उघडपणे युक्रेनसह नाटो देशांसोबत आहेत, तर दुसरीकडे रशियाला चीनचा उघड पाठिंबा मिळत आहे. महायुद्धाचा धोका दिवसेंदिवस अधिक वाढत आहे कारण पुतिन आता रिकाम्या हाताने परतायला तयार नाहीत, तर अमेरिकेला कोणत्याही किंमतीवर युक्रेन वाचवायचं आहे. म्हणजेच जग दोन गटात विभागलं गेलं असून येत्या काळात हे दोन गट महायुद्धाचं कारण बनू शकतात.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाwarयुद्धVladimir Putinव्लादिमीर पुतिनJoe Bidenज्यो बायडन