शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

Russia Ukraine War: 'आई, हे फार कठीण, आम्ही नागरिकांवरही बॉम्बिंग करत आहोत...'; रशियन सैनिकाचा शेवटचा मेसेज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 15:35 IST

युक्रेन-रशिया युद्धाच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्र महासभेत आपतकालीन सत्र बोलावण्यात आले. याच सत्रात, युक्रेनच्या युनायटेड नेशन्समधील राजदूताने युक्रेनमधील एका घटनेचा संदर्भ देत, रशियन सैनिकाचा संदेश वाचला. यात रशियन सैन्य आता युक्रेनियन नागरिकांवरही हल्ले करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

सध्या युक्रेनमध्ये रशियन सैन्यांने धुमाकूळ घातला आहे.  युक्रेनमध्ये रशियाकडून होत असलेला विध्वंस संपूर्ण जग पाहत आणि ऐकत आहे. मात्र, तरीही युक्रेन मागे हटायला तयार नाही. दरम्यान, युक्रेन-रशिया युद्धाच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्र महासभेत आपतकालीन सत्रही बोलावण्यात आले. याच सत्रात, युक्रेनच्या युनायटेड नेशन्समधील राजदूताने युक्रेनमधील एका घटनेचा संदर्भ देत, रशियन सैनिकाचा संदेश वाचला. यात रशियन सैन्य आता युक्रेनियन नागरिकांवरही हल्ले करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

खरे तर हे युद्ध थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेचे आपत्कालीन सत्र बोलावण्यात आले होते. या सत्रात, रशियाने युक्रेनसोबतचे युद्ध थांबवण्यासंदर्भातील प्रस्तावाला अनेक देशांच्या राजदूतांनी पाठिंबा दिला. या सत्राला संबोधित करताना संयुक्त राष्ट्रातील युक्रेनचे राजदूत सर्गेई किस्लित्स्या  म्हणाले, एका रशियन सैनिकाने आपल्या आईला फोनवरून जो अखेरचा मेसेज पाठवला, त्यानंतर त्या सैनिकाचा युद्धात मृत्यू झाला.

राजदुतांच्या मते त्या रशियन सैनिकाने आपल्या आईला केलेल्या मेसेजमध्ये लिहिले, 'आई मी युक्रेनमध्ये आहे. येथे खरे युद्ध सुरू आहे आणि मला भीती वाटत आहे. आम्ही सर्वच शहरांवर बॉम्बिंग करत आहोत. एवढेच नाही, तर आम्ही नागरिकांनाही निशाणा बनवत आहोत.' यापूर्वी, त्या रशियन सैनिकाची आई त्याला विचारते की, त्याला बोलण्यासाठी एवढा वेळ का लागला? आणि तुझ्यासाठी एक पार्सल पाठवता येऊ शकते? यानंतर हा सैनिक असा मेसेज करतो.

एवढेच नाही, तर हा सैनिक पुढे लिहितो, 'आम्हाला सांगण्यात आले होते की, युक्रेनची जनता आपले स्वागत करेल. मात्र, ते आमच्या वाहनांच्या खाली पडत आहेत. स्वतःला चाकांखाली फेकत आहेत आणि आम्हाला पुढे जाण्यास विरोध करत आहेत. ते आम्हाला फॅसिस्ट म्हणत आहेत. आई, हे फार कठीण आहे.' हा मेसेज वाचताना युक्रेनचे राजदूत सभेत म्हणाले, की 24 फेब्रुवारीपासून सुरू झालेली ही शोकांतिका किती मोठी आहे, याची कल्पना करा. तसेच, हे सर्व तुमच्या समोर घडत आहे, अशीही कल्पना करा, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाBombsस्फोटकेunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ