शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War:युक्रेनीयन सैन्य, जनतेच्या चिवट प्रतिकारामुळे रशियन सैन्य हतबल, संतप्त पुतीन युक्रेनवर अणुबॉम्ब टाकणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 10:16 IST

Russia Ukraine War: युक्रेनचे सैन्य आणि नागरिकांकडून होत असलेल्या चिवट प्रतिकारामुळे रशियन लष्कर हतबल झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या व्लादिमीर पुतीन यांनी सैन्याला अण्वस्त्रे सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मॉस्को - रशिया आणि युक्रेनमध्ये पेटलेल्या युद्धाला आता पाच दिवस उलटत आले आहेत. रशियाच्या आक्रमणासमोर दोन तीन दिवसांत युक्रेन शरणागती पत्करेल असे वाटत होते. मात्र युक्रेनचे सैन्य आणि नागरिकांकडून होत असलेल्या चिवट प्रतिकारामुळे रशियन लष्कर हतबल झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या व्लादिमीर पुतीन यांनी सैन्याला अण्वस्त्रे सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता पुतीन युक्रेनवर अणुबॉम्ब टाकणार का, अशी चिंता जागतिक नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. असे झाल्यास जागतिक इतिहासावर त्याचे गंभीर परिणाम होतील. त्यामुळे पुतीन यांच्या या आदेशामागचा संदर्भ शोधण्याचा प्रयत्न विश्लेषकांकडून केला जात आहे.

विश्लेषकांच्या मते पुतीन यांच्या डोक्यात काय चाललंय याचा अंदाज लावणे भल्या भल्यांना जमत नाही. आधी पुतीन हे युक्रेनवर हल्ला करणार नाहीत, असं वाटत होतं. मात्र त्यांनी युक्रेनवर भीषण हल्ला चढवला. तत्पूर्वीही क्रिमीया हा प्रांत ते ताब्यात घेणार नाहीत, असं वाटत होतं. मात्र त्यांनी क्रिमीया वर कब्जा केला. एवढेच नाही तर पुतीन हे युक्रेनवर संपूर्ण शक्तिनिशी हल्ला करणार नाहीत, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र पुतीन यांनी तेही करून दाखवले. त्यामुळे आता ते मनात आणलं तर युक्रेनवर अणुबॉम्ब टाकू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

युक्रेनवरील आक्रमणाला सुरुवात होण्यापूर्वीची पुतीन यांची वक्तवे पाहिली तर त्यात असं दिसतं की, ते युक्रेनमध्ये विशेष लष्करी मोहीम चालवतील, असं पुतीन यांनी म्हटलं होतं. मात्र प्रत्यक्षात त्यांनी युक्रेनवर थेट हल्ला केला. तसेच यामध्ये कुणी बाहेरच्या देशाने हस्तक्षेप केला तर त्याची अवस्था अशी होईल जी इतिहासात कुणाचीही झालेली नसेल, असा इशाराच पुतीन यांनी दिला आहे.  नोबेल पुरस्कार विजेते आणि नोवाया गॅझेट वृत्तपत्राचे एडिटर दिमित्री मुरातोव्ह यांनी सांगितले की, पुतीन यांचं हे वक्तव्य हे जागतिक नेत्यांना थेट अणुयुद्धाची धमकी आहे. दिमित्री यांनी सांगितले की, या टीव्ही मुलाखतीमध्ये पुतीन केवळ रशियाचेच नाही तर संपूर्ण जगाचे शहेंशाह आहेत. ही गोष्ट अशी आहे की कुठल्याही कारचा चालक तिची चावी आपल्या मर्जीनुसार बोटांमध्ये खेळवतो, तशी आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनwarयुद्ध