शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 13:52 IST

पुतिन म्हणाले, "आमच्याकडे एक म्हण प्रसिद्ध आहे, जेथे रशियन सैनिकांचा पाय पडतो, ते आमचे असते."

मॉस्को : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी एक मोठे विधान करत संपूर्ण युक्रेनवरच दावा ठोकला आहे. सेंट पीटर्सबर्ग येथे रशियाच्या एका मुख्य आर्थिक व्यासपीठावरून बोलताना, रशियन आणि युक्रेनियन 'एकच लोक' आहेत. या अर्थाने 'संपूर्ण युक्रेन आमचा आहे,' असे व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. याचबरोबर, रशियन सैन्य युक्रेनमधील सुमी शहराचा ताबा घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही. असेही पुतीन म्हणाले. यावर युक्रेनने पुतीन यांच्या या विधानाचा निषेध केला असून, हा पुतीन यांचा वेडेपणा असल्याचे म्हटले आहे.

पुतिन म्हणाले, "आमच्याकडे एक म्हण प्रसिद्ध आहे, जेथे रशियन सैनिकांचा पाय पडतो, ते आमचे असते." युक्रेनवरील आपली भूमिका स्पष्ट करताना, रशियन अध्यक्ष पुतीन म्हणाले, "रशियाने युक्रेनच्या सार्वभौमत्वाच्या अधिकारावर कधीही शंका उपस्थित नाही. मात्र, युक्रेनने १९९१ मध्ये तटस्थ राज्य म्हणून स्वातंत्र्य घोषित केले होते. रशियन सैन्य रशियन भूभागावरील हल्ले रोखण्यासाठी युक्रेनच्या ईशान्य सुमी प्रदेशात बफर झोन तयार करत आहे." महत्वाचे म्हणजे, रशियन सैन्य सुमी शहरावर ताब्या घेण्यासंदर्भातील शक्यताही त्यांनी नाकारली नाही.

यावेळी, आपल्या मागणीचा पुनरुच्चार करत पुतीन पुढे म्हणाले, "कीवने मॉस्कोच्या प्रादेशिक लाभांची वास्तविकता स्वीकारावी आणि नाटोमध्ये सहभागी होण्याचा विचार सोडून द्यावा. आम्ही युक्रेनच्या आत्मसमर्पणाची मागणी करत नाही. मात्र, त्यांनी जमिनीवरील वास्तव ओळखावे. मॉस्कोने अनेक वेळा कीवला समेटाचे आवाहन केले आहे.

...हा पुतीन यांचा वेडेपणा -युक्रेनच्या परराष्ट्रमंत्री अँड्री सिबिगा यांनी पुतीन यांच्यासंदर्भात भाष्यक करत, पुतीन यांचे विधान म्हणजे, 'वेडेपणा' असून रशियाविरोधात कठोर प्रतिबंध लादण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे, "रशियाला शांततेसाठी भाग पाडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, शिक्षेपासून वाचण्याची भावना नष्ट करणे.'

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्ध