Russia Ukraine War : "...आणि तेच आमचं शेवटचं बोलणं ठरलं"; नवीनच्या मित्राने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 08:30 AM2022-03-02T08:30:00+5:302022-03-02T08:38:05+5:30

Russia Ukraine War : नवीनचं मृत्यूआधी त्याचा जवळचा मित्र आणि रुममेट असलेल्या श्रीकांतसोबत फोनवर बोलणं झालं होतं. 

Russia Ukraine War naveen left bunker to buy groceries friend of indian killed in ukraine | Russia Ukraine War : "...आणि तेच आमचं शेवटचं बोलणं ठरलं"; नवीनच्या मित्राने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? 

Russia Ukraine War : "...आणि तेच आमचं शेवटचं बोलणं ठरलं"; नवीनच्या मित्राने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? 

Next

युक्रेनमधील खार्किव येथे झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. नवीन शेखरप्पा असे मृताचे नाव आहे. तो 21 वर्षांचा होता. नवीन कर्नाटकातील हावेरी येथील चालगेरी येथील रहिवासी होता. बचावादरम्यान झालेल्या हल्ल्यात नवीनचा मृत्यू झाला. याच दरम्यान त्याच्या एका मित्राने मृत्यू नेमकं काय घडलं ते सांगत आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. नवीनचं मृत्यूआधी त्याचा जवळचा मित्र आणि रुममेट असलेल्या श्रीकांतसोबत फोनवर बोलणं झालं होतं. 

नवीनने आपण सुपरमार्केटमध्ये खाण्यासाठी काहीतरी घ्यायला आलो असल्याची माहिती दिली होती असं श्रीकांतने सांगितलं. त्यानंतर दहा मिनिटांनी श्रीकांतने जेव्हा नवीनला पुन्हा फोन केला तेव्हा एका युक्रेनियन महिलेने फोन उचलला होता. ती जीवाच्या आकांताने रडत होती. त्यानंतर रशियन सैनिकांनी केलेल्या गोळीबारात आपल्या मित्राचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्याचं श्रीकांतने सांगितलं. एनडीटीव्हीला त्याने ही माहिती दिली आहे. जीवनावश्यक सामान आणि खाण्यासाठी अन्न पदार्थ संपल्याने नवीनला चिंता लागून राहिली होती. त्यामुळेच तो बाहेर पडला. जर तो यासाठी गेला नसता तर आज जिवंत असता असं श्रीकांतने म्हटलं आहे. 

"... आणि तेच आमचं शेवटचं बोलणं ठरलं"

"नवीन घराबाहेर पडला त्यावेळी आम्ही झोपलो होतो. खाण्यासाठी काहीतरी अन्नपदार्थ घेण्यासाठी घराबाहेर पडला होता. आम्ही खरंतर खूप भूकेलो होतो. घटनेच्या आधीच्या रात्रीदेखील आम्ही उपाशीपोटी झोपलो होतो. आम्ही अन्नासाठी घराबाहेर पडलो असतो, पण संपूर्ण शहरात कर्फ्यू लावण्यात आलेला होता. घराबाहेर पडण्यास मनाई होती. तरीही आम्हाला काहीतरी अन्न मिळावं या आशेने नवीन घराबाहेर पडला होता. मी नवीनला सकाळी आठ वाजता फोन केला. त्यावेळी त्याने आपण खाण्यासाठी काहीतरी पदार्थ घेण्यासाठी सुपरमार्केटमध्ये आल्याचं सांगितलं. त्याने मला काही पैसे ट्रान्सफर करायला सांगितले. त्यानंतर मी पैसे ट्रान्सफर केले आणि त्याला तातडीने लवकर घरी येण्यास सांगितलं. त्यानेही आपण लगेच येतो असं सांगितलं. तेच आमचं शेवटचं बोलणं ठरलं" असं श्रीकांतने म्हटलं आहे. 

"नवीन हा गेल्या चार वर्षांपासून माझा सर्वात जवळता मित्र"

"नवीन हा गेल्या चार वर्षांपासून माझा सर्वात जवळता मित्र होता. मी दहा मिनिटांनी पुन्हा नवीनला कॉल केला. पण तिकडून काहीच प्रतिसाद आला नाही. त्याने फोन उचलला नाही. थोड्यावेळाने एका महिलेने फोन उचलला. ती जीवाच्या आकांताने रडत होती. मला काही कळेना. मला तिची भाषाही समजत नव्हती. मी तिथल्या एका स्थानिक व्यक्तीकडे फोन दिला जो त्या महिलेच्या भाषेला समजू शकेल. तेव्हा नवीनचा गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती मिळाली" असं श्रीकांतने सांगितलं आहे. दोन दिवसांपूर्वीच नवीनचं आपल्या कुटुंबियांशी बोलणं झालं होतं, नवीनने व्हिडिओ कॉल करुन आपल्या कुटुंबाला युक्रेनमधल्या परिस्थितीची माहिती दिली होती. इथं भीषण परिस्थिती असून लवकरात लवकर मायदेशात परतायचं असल्याचं त्याने आपल्या कुटुंबियांना सांगितलं होतं. पण दुर्देवाने तो परतलाच नाही.
 

Web Title: Russia Ukraine War naveen left bunker to buy groceries friend of indian killed in ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.