शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
2
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिसांना...
3
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
4
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
5
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
6
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
7
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
8
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
9
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
10
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
11
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
12
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
13
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
14
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
15
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
16
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
17
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
18
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
19
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
20
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!

Russia-Ukraine War: युद्ध जगतातला 'खली' युक्रेनच्या जमिनीवर उतरला; बेस्ट स्नायपर Wali दिवसाला ४० सैनिकांना टिपतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 14:38 IST

Russia-Ukraine War: वली हा कॅनडाच्या जॉइंट टास्क फोर्स (JTF-2) युनिटचा जवान आहे. या युनिटच्या स्नायपर्सच्या नावावर सर्वात लांब पल्ल्याचे लक्ष्य गाठण्याचा विक्रम आहे.

युक्रेन-रशिया युद्धाला आता १५ दिवस लोटले आहेत. ४८ तासांत युक्रेन पाडण्याचे स्वप्न पाहणाऱ्या रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची  झोप उडाली आहे. जगभरातून रशियाच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरु झाले असून यातून तरण्याची शक्यता कमी होत चालली आहे. अद्याप रशियाला युक्रेनमध्ये फारसे यश आलेले नाही. युक्रेनचे सैनिक आणि नागरिकांसह आता परदेशी नागरिक देखील युद्धात उतरू लागले आहेत. यातच रशियन सैनिकांना घाम फोडणारी बातमी आली आहे. (World's most famous sniper)

जगातील सर्वात बेस्ट स्नायपर म्हणून युद्ध जगतात नावाजला गेलेल्या वलीने (Wali) युक्रेनच्या युद्धभूमीमध्ये पाय ठेवले आहेत. त्याची क्षमता एवढी प्रचंड आहे की तो एका दिवसाला ४० सैनिकांना जागच्या जागी टिपू शकतो. वली हा एक फ्रेंच-कॅनडियन कॉम्प्युटर सायंटिस्ट आहे. त्याने अफगाणिस्तानमध्ये दोन वेळा स्पेशल ऑपरेशनमध्ये भाग घेतला होता. २००९ ते २०११ मध्ये वलीने अनेक दहशतवाद्यांना यमसदनी पाठविले होते. यामुळेच त्याला वली नावाची उपाधी देण्यात आली. 

वर्ल्ड मीडियाला दिलेल्या मुलाखतीत त्याने युक्रेनमध्ये येऊन मला खूप चांगले वाटत आहे. मला युक्रेनच्या लोकांना मदत करायची आहे. रशियन सैन्य युक्रेनमधील निरपराध लोकांवर बॉम्बफेक करत आहे. आठवडाभरापूर्वी मी कॉम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये व्यस्त होतो. पण आता तो बंदूक घेऊन रणांगणात उतरलो आहे. युक्रेनच्या युद्धाचा भाग व्हावे हे पत्नीला  पसंत नव्हते. पण मी कठोर निर्णय घेतला आणि इथे आलो.

वली हा कॅनडाच्या जॉइंट टास्क फोर्स (JTF-2) युनिटचा जवान आहे. या युनिटच्या स्नायपर्सच्या नावावर सर्वात लांब पल्ल्याचे लक्ष्य गाठण्याचा विक्रम आहे. या स्नायपर्सनी साडे तीन किमीवरील लक्ष्य भेदले आहे. जेव्हा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी परदेशी सैनिकांना रशियाविरुद्ध युद्धासाठी आमंत्रित केले, तेव्हा वलीने न घाबरता युक्रेनला मदत करण्याचा निर्णय घेतला.

nipers देखील श्रेणींमध्ये विभागले जातात. एक स्नायपर जो दररोज 5 ते 6 शत्रूंना लक्ष्य करतो तो चांगला स्नायपर मानला जातो. याशिवाय 7 ते 10 शत्रूंना लक्ष्य करणारा स्नायपर सर्वोत्तम मानला जातो. मात्र एका दिवसात 40 लोकांना टार्गेट करण्याची क्षमता वलीमध्ये आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्ध