शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War : युक्रेनहून परतणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी; उपचारासाठी कीव्हला पाठवलं, केंद्रीय मंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 10:16 IST

Russia Ukraine War : केंद्रीय मंत्री व्ही के सिंह यांनी युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली आहे. यानंतर त्यांला पुन्हा शहरात नेण्यात आले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

नवी दिल्ली - युक्रेनमधील खारकीव्ह येथे झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. नवीन शेखरप्पा असे मृताचे नाव आहे. तो 21 वर्षांचा होता. नवीन कर्नाटकातील हावेरी येथील चालगेरी येथील रहिवासी होता. बचावादरम्यान झालेल्या हल्ल्यात नवीनचा मृत्यू झाला. यानंतर आता युक्रेनहून परतणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली असून त्याला उपचारासाठी कीव्हला पाठवण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

केंद्रीय मंत्री व्ही के सिंह यांनी युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली आहे. यानंतर त्यांला पुन्हा शहरात नेण्यात आले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं म्हटलं आहे. युद्धादरम्यान, हे सगळं होत असल्याचंही मंत्री म्हणाले आहेत. तसेच आम्ही जास्तीत जास्त भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. जखमी विद्यार्थ्याची ओळख पटवली जात आहे. यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत असंही व्ही के सिंह यांनी म्हटलं आहे. 

"...आणि तेच आमचं शेवटचं बोलणं ठरलं"; नवीनच्या मित्राने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? 

नवीनच्या मृत्यूआधी त्याचा जवळचा मित्र आणि रुममेट असलेल्या श्रीकांतसोबत फोनवर बोलणं झालं होतं. नवीनने आपण सुपरमार्केटमध्ये खाण्यासाठी काहीतरी घ्यायला आलो असल्याची माहिती दिली होती असं श्रीकांतने सांगितलं. त्यानंतर दहा मिनिटांनी श्रीकांतने जेव्हा नवीनला पुन्हा फोन केला तेव्हा एका युक्रेनियन महिलेने फोन उचलला होता. ती जीवाच्या आकांताने रडत होती. त्यानंतर रशियन सैनिकांनी केलेल्या गोळीबारात आपल्या मित्राचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्याचं श्रीकांतने सांगितलं. एनडीटीव्हीला त्याने ही माहिती दिली आहे. जीवनावश्यक सामान आणि खाण्यासाठी अन्न पदार्थ संपल्याने नवीनला चिंता लागून राहिली होती. त्यामुळेच तो बाहेर पडला. जर तो यासाठी गेला नसता तर आज जिवंत असता असं श्रीकांतने म्हटलं आहे. 

"नवीन घराबाहेर पडला त्यावेळी आम्ही झोपलो होतो. खाण्यासाठी काहीतरी अन्नपदार्थ घेण्यासाठी घराबाहेर पडला होता. आम्ही खरंतर खूप भूकेलो होतो. घटनेच्या आधीच्या रात्रीदेखील आम्ही उपाशीपोटी झोपलो होतो. आम्ही अन्नासाठी घराबाहेर पडलो असतो, पण संपूर्ण शहरात कर्फ्यू लावण्यात आलेला होता. घराबाहेर पडण्यास मनाई होती. तरीही आम्हाला काहीतरी अन्न मिळावं या आशेने नवीन घराबाहेर पडला होता. मी नवीनला सकाळी आठ वाजता फोन केला. त्यावेळी त्याने आपण खाण्यासाठी काहीतरी पदार्थ घेण्यासाठी सुपरमार्केटमध्ये आल्याचं सांगितलं. त्याने मला काही पैसे ट्रान्सफर करायला सांगितले. त्यानंतर मी पैसे ट्रान्सफर केले आणि त्याला तातडीने लवकर घरी येण्यास सांगितलं. त्यानेही आपण लगेच येतो असं सांगितलं. तेच आमचं शेवटचं बोलणं ठरलं" असं श्रीकांतने म्हटलं आहे. 

 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारत