शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेनचा रशियावर आणखी एक मोठा हल्ला, ११०० किलो स्फोटकांनी क्रिमिया पूल उडवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 19:53 IST

Russia-Ukraine War : दोन दिवसांपूर्वीच युक्रेनने रशियाची ४१ लढाऊ विमाने नष्ट केली आहेत.

Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. युक्रेनने ७२ तासांच्या आत रशियावर आणखी एक मोठा हल्ला केला आहे. यावेळी युक्रेनियन सैन्याने ११०० किलो पाण्याखालील स्फोटके पेरून क्रिमिया पूल उडवून दिला. यामुळे पुलाचे किती नुकसान झाले, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. यापूर्वी १ जून रोजी युक्रेनने ड्रोन हल्ल्यात रशियाचे ५ लष्करी तळ उडवून दिले होते. यामध्ये युक्रेनने रशियाची ४१ लढाऊ विमाने नष्ट केल्याचा दावा केला होता.

युक्रेनच्या सुरक्षा सेवेनुसार (SBU) आता या नवीन हल्ल्यात TNT स्फोटकांचा वापर करण्यात आला आहे. या हल्ल्यात क्रिमिया पुलाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात येतोय. हा रशियाला क्रिमियाशी जोडणाऱ्या एक धोरणात्मक आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या पूलावर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याआधीही युक्रेनने अनेक वेळा हा पूल उडवण्याचा प्रयत्न केला होता.

क्रिमिया पुलाचे महत्त्व काय आहे?

रशिया आणि युक्रेन दोघांसाठीही क्रिमिया पूल धोरणात्मकरित्या महत्त्वाचा आहे. हा रशियाने व्यापलेल्या क्रिमियाशी जोडणारा अतिशय महत्त्वाचा पूल आहे. त्याला केर्च सामुद्रधुनी पूल असेही म्हणतात. हा पूल रशियाच्या मुख्य भूभागाला क्रिमियाशी जोडतो. रशियन सैन्यासाठी या मार्गाने क्रिमिया आणि दक्षिण युक्रेनला शस्त्रे, सैनिक आणि रसद पाठवण्याचा हा मुख्य मार्ग आहे. अशा परिस्थितीत, युक्रेनने या पुलाचे नुकसान करणे किंवा नष्ट करणे हे रशियन लष्करी पुरवठ्याचा कणा मोडण्यासारखे आहे.

क्रिमिया पूल कधी बांधला ?हा पूल २०१८ मध्ये बांधण्यात आला. २०१४ मध्ये रशियाने क्रिमियावर कायमचा ताबा मिळवण्याचे प्रतीक म्हणून तो बांधला होता. पण, युक्रेन आणि पाश्चात्य देशांसाठी हा पूल बेकायदेशीर ताब्याचे प्रतीक आहे. त्याला लक्ष्य करणे हे रशियाचे मनोबल कमकुवत करण्याचे आणि जगाला संदेश देण्याचा मार्ग आहे. या पुलाद्वारे व्यापार आणि पर्यटनाद्वारे क्रिमियाची अर्थव्यवस्था रशियाशी जोडलेली आहे. तो नष्ट केल्याने रशियन आर्थिक आणि नागरी जीवनावरही परिणाम होतो.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनwarयुद्धInternationalआंतरराष्ट्रीय