शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

Russia Ukraine War: युक्रेनमधील एका घरावर पडला ५०० किलो वजनाचा रशियन बॉम्ब; पुढे काय झालं, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 11:06 IST

रशियाकडून युक्रेनवर मिसाईलचा मारा करण्यात येत आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा बारावा दिवस आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत रशियाने युक्रेनवर एकूण ६०० मिसाईल हल्ले केल्याचा दावा युक्रेनच्या मीडियाने केला आहे. तसेच रशियाने आपले जवळपास ९५ टक्के सैन्य युक्रेनमध्ये तैनात केले आहे.

रशियाकडून युक्रेनवर मिसाईलचा मारा करण्यात येत आहे. रशियाने पुन्हा एकदा युक्रेनच्या खार्किव शहरावर मिसाईल डागले आहेत. या हल्ल्यात शहरातील अनेक रहिवासी इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.  या युद्धात युक्रेनची मोठ्याप्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. दरम्यान गेल्या अकरा दिवसांमध्ये रशियाने अकरा हजार सैनिक मारल्याचा दावा युक्रेनच्या वतीने करण्यात आल आहे. याचदरम्यान युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ट्विटरद्वारे एक धक्कादायक माहिती शेअर केली आहे. 

युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी ट्विटरवर एका बॉम्बचे छायाचित्र पोस्ट केले आहे आणि असे म्हटले आहे की, अशा बॉम्बमुळे युक्रेन देशातील लोकांचा जीव जात आहे. यासोबतच युक्रेनला लढाऊ विमान देण्याचे आवाहनही त्यांनी केले. चेर्निव्हमधील एका घरावर हा भीषण ५०० किलो वजनाचा रशियन बॉम्ब पडला आहे. पण तो फुटला नाही. अनेक बॉम्बस्फोट झाले आहेत, ज्यामध्ये निष्पाप पुरुष, महिला आणि लहान मुलं मारली जात आहेत, असं 

युक्रेनमध्ये रविवारी मारियुपोल येथील दुसरा युद्धविरामदेखील अयशस्वी ठरला. शहरात रशियाने हल्ले सुरू ठेवल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. काल रशियाने खारकीव्ह व अन्य शहरांवरही जोरदार हल्ले चढवले. या माऱ्याच्या तीव्रतेमुळे युक्रेनमधील गॅस यंत्रणेची १६ गॅस पुरवठा केंद्रे बंद करण्यात आली. कनिव येथील जलविद्युत निर्मिती केंद्रावर कब्जा करण्यावर रशियाने आता लक्ष केंद्रित केले आहे.

नरेंद्र मोदी आणि वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्यात चर्चा-

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा करणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

‘ऑपरेशन गंगा’ अंतिम टप्प्यात-

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी राबविण्यात येत असलेले ‘ऑपरेशन गंगा’ अंतिम टप्प्यात आहे. युक्रेनमधून आतापर्यंत १६ हजाराहून अधिक भारतीय परतले आहेत. आज ८ विमाने पाठविण्यात आले असून, १५०० भारतीयांना परत आणण्यात येणार आहे. रविवारी ११ विमानांमधून २१३५ भारतीय परतले.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशिया