शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine Crisis : १६ हजार भारतीयांना सरकार स्वखर्चाने मायदेशात आणणार; एअर इंडियाची विमाने रवाना होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 05:58 IST

भारतीयांसाठी सर्वात माेठ्या आणि अवघड अशा बचाव माेहिमेला सुरुवात झाली आहे. भारतीयांना हंगेरी, पाेलंड, राेमानिया आणि स्लाेव्हाक रिपब्लिकमार्गे एअरलिफ्ट करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये भारताला सर्वाधिक चिंता आहे ती युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची. युक्रेनची हवाई हद्द बंद आहे. त्यामुळे भारतीयांसाठी सर्वात माेठ्या आणि अवघड अशा बचाव माेहिमेला सुरुवात झाली आहे. भारतीयांना हंगेरी, पाेलंड, राेमानिया आणि स्लाेव्हाक रिपब्लिकमार्गे एअरलिफ्ट करण्यात येणार आहे. एअर इंडियाची दाेन विमाने रात्री उशिरा रवाना होणार आहेत. नंतर आणखी विमाने पाठविण्यात येऊ शकतात. याचा सर्व खर्च केंद्र सरकार करणार आहे. 

रशियाने युक्रेनच्या पूर्वेकडून हल्ला केला आहे. त्यामुळे पश्चिमेकडील देशांमधून भारतीयांना परत आणता येऊ शकते. त्यादृष्टीने माेहीम आखण्यात आली आहे. राजधानी किव्ह येथील विमानतळावरही हल्ले झाले हाेते. त्यामुळे भारतीयांना परत आणायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला हाेता. त्यातून मार्ग काढण्यात आला आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी युक्रेनच्या चार शेजारी राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांसाेबत यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती दिली. तर, गरज भासल्यास वायुदलाची विमानेदेखील एअरलिफ्ट माेहिमेसाठी सज्ज असल्याची माहिती परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रींगला यांनी दिली.

...तर विद्यार्थी अडकले नसतेसर्व वर्ग तिथे ऑफलाईन पद्धतीने सुरू हाेते. युद्धाची चाहुल लागल्यानंतर भारतीय दुतावासाला विद्यापीठाशी बाेलून ऑनलाईन वर्ग करुन देण्याची विनंती अनेक विद्यार्थ्यांनी केली हाेती. ऑनलाईन वर्गाची विनंती मान्य केली असती तर आम्ही अडकलाे नसताे, असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

...असे करणार एअरलिफ्ट

  • हंगेरी, पोलंड, रोमानिया आणि स्लाेव्हाक रिपब्लिकपर्यंत रस्तेमार्गे युक्रेनमधून भारतीय निघाले आहेत. 
  • तेथून भारतीयांना एअरलिफ्ट करण्यात येईल. हंगेरीची झाहाेनी, पाेलंडची क्रेकाविच, स्लाेव्हाकची विस्ने आणि राेमानियाच्या सुशिव्हा सीमेपर्यंत परराष्ट्र मंत्रालयाचे विविध पथके पाठविण्यात आली आहेत. 
  • या सीमांजवळ असलेल्या युक्रेनमधील भारतीयांनी जवळच्या पथकांना संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे. युक्रेनमध्ये सुमारे २० हजार भारतीय आहेत. त्यापैकी ४ हजार जण तेथून बाहेर पडले आहेत. उर्वरित १६ हजार जणांना परत आणणार आहे.

सीमा गाठणार कशी? 

  • पाेलंड, राेमानिया आणि हंगेरीमार्गे भारतीयांच्या परतीचा मार्ग खुला झाला असला तरीही तेथे पाेहाेचणे अतिशय जिकिरीचे आहे. 
  • किव्ह येथून या देशांच्या सीमेवर पाेहाेचण्यासाठी १२ ते १४ तास लागू शकतात. काही विद्यार्थी राेमानिया सीमेवर पाेहाेचले आहेत. 
  • काही विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना सीमेपर्यंत पाेहाेचविण्यासाठी बसेसची साेय केली. काही टॅक्सीने हंगेरीच्या सीमेकडे निघाले.विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याबाबत सध्या हालचाली नाहीत. मात्र, या देशांच्या सीमेजवळ असलेल्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम बाहेर काढण्यात येणार आहे.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारतAir Indiaएअर इंडिया