शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine Conflict : अमेरिकेचा मोठा दावा; 'या' तारखेला युक्रेनवर हल्ला करणार रशिया, सामन्यासाठी NATO ही तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 17:20 IST

अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी रविवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी सुमारे एक तास चर्चा केली. यावेळी त्यांनी पुतीन यांना युक्रेनविरोधातील लष्करी कारवाई संदर्भात समजावले आणि इशाराही दिला. मात्र, व्हाईट हाऊसचे म्हणणे आहे की, या 60 मिनिटांच्या संभाषणामुळे परिस्थितीत काही बदल होण्याची चिन्हे नाहीत.

रशियाने युक्रेनला तीन बाजूंनी घेरले आहे. युक्रेनची राजधानी कीव येथे मॅरेथॉन राजनैतिक आणि लष्करी बैठका सुरू आहेत. अमेरिकन गुप्तचर संस्थांने म्हटल्यानुसार, आता रशियाने युक्रेनच्या सीमेवर 1 लाख 30 हजार सैनिक जमवले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी रविवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी सुमारे एक तास चर्चा केली. यावेळी त्यांनी पुतीन यांना युक्रेनविरोधातील लष्करी कारवाई संदर्भात समजावले आणि इशाराही दिला. मात्र, व्हाईट हाऊसचे म्हणणे आहे की, या 60 मिनिटांच्या संभाषणामुळे परिस्थितीत काही बदल होण्याची चिन्हे नाहीत.

रशिया केव्हा करणार हल्ला - खुद्द राष्ट्रपती ज्यो बायडेन आणि त्यांच्या गुप्तचर संस्था, रशिया युक्रेनवर केव्हा हल्ला करणार?  हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. रशिया अत्यंत गुप्तपणे पुढे सरकत आहे. पण अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणाही पूर्ण क्षमतेने रशियाची योजना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

रशिया बुधवारी म्हणजेच 16 फेब्रुवारीला हिट करू शकतो टारगेट - गुप्तचर विभागाच्या माहितीवरून अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, रशिया बुधवारी म्हणजेच 16 फेब्रुवारीला आपल्या टारगेटवर हल्ला चढवू शकतो. मात्र, ही माहिती देणाऱ्या अधिकाऱ्याला अमेरिकी प्रशासनाच्या वतीने माध्यमांशी बोलण्याचा अधिकार नव्हता. तसेच ही गुप्त माहिती किती स्पष्ट आहे, हेही अद्याप स्पष्ट नाही. तसेच, आणखी एका रिपोर्टनुसार, रशिया चीनमध्ये 20 फेब्रुवारीला विंटर ओलिम्पिक संपण्यापूर्वी हल्ला करू शकतो.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास मॉस्कोवर कठोर आर्थिक निर्बंध लादले जातील आणि NATO कडून प्रत्युत्तर दिले जाईल, असे बायडेन यांनी म्हटले आहे. व्हाईट हाऊसच्या म्हणण्यानुसार, अमेरिका आणि युक्रेनने डिटरेन्स आणि डिप्लोमसीच्या रणनीतीवर सहमती दर्शवली आहे. म्हणजेच रशियाशी राजनैतिक पातळीवरील चर्चा सुरू राहील आणि दोन्ही देश लष्करी तयारीही वाढवतील.

NTAO कडून युक्रेनला मिळतायत शस्त्रास्त्रे -राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी आपल्या देशातील नागरिकांना कुठल्याही प्रकारची भीती न बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच यामुळे युक्रेनची अर्थव्यवस्था कमकुवत होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. याच बरोबर, झेलेन्स्की, आपल्या संरक्षण तज्ञांसह, अमेरिका आणि इतर NTAO देशांकडून मिळत असलेली शस्त्रास्त्रेही तैनात करण्यात गुंतलेले आहेत. दरम्यान, झेलेन्स्की आपल्या सूत्रांच्या माध्यमानेही रशियाच्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाrussiaरशियाwarयुद्धVladimir Putinव्लादिमीर पुतिनJoe Bidenज्यो बायडन