शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

Russia Sanctions: रशिया सोडून जाणाऱ्या कंपन्यांची संपत्ती जप्त होणार? पुतीन मोठा पलटवार करण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 13:24 IST

युक्रेनवरील हल्ल्यानंतर 100 हून अधिक अमेरिकन आणि इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांनी रशियातील आपला व्यवसाय गुंडाळला आहे.

युक्रेनवर (Ukraine) चढाई केल्यापासून रशिया (Russia) अमेरिका (US) आणि पश्चिमेकडील देशांच्या निशाण्यावर आहे. रशियाविरुद्ध एकानंतर एक अनेक आर्थिक निर्बंध (Economic Sanctions) लावण्यात आले आहेत. अमेरिकेने नुकतेच रशियन तेल आणि गॅसवरही नर्बंध (Sanction On Russian Oil&Gas) लादण्याचा निर्णय घेतला आहे.

युक्रेनवरील हल्ल्यानंतर 100 हून अधिक अमेरिकन आणि इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांनी रशियातील आपला व्यवसाय गुंडाळला आहे. यात बोईंग आणि एअरबस सारख्या विमान निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांपासून ते फेसबुक (Facebook) आणि गुगल (Google) सारख्या टेक कंपन्यांचाही समावेश आहे. मात्र, आता रशिया याचा सामना करण्याची आणि पलटवार करण्याची तयारी करत आहे. यासाठी रशियातील ज्या कंपन्यांनी आपला व्यवसाय बंद केला आहे, त्यांचे कारखाने आणि इतर मालमत्तांचे राष्ट्रीयीकरण करण्याची तयारी सुरू केली आहे.

पुतिन यांच्या पक्षाने केलंय भाष्य  - राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांच्या 'यूनाइटेड रशिया पार्टी (United Russia Party)'चे जनरल काउंसिलचे सेक्रेटरी आंद्रेइ तुर्चक (Andrei Turchak) यांनी दोन दिवसांपूर्वीच यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, युक्रेनवरील हल्ल्यानंतर, पश्चिमेकडील ज्या कंपन्या रशिया सोडून जात आहेत, त्यांच्या संपूर्ण ऑपरेशनचे राष्ट्रीयीकरण करणे आवश्यक आहे. असे केल्यास लोकांच्या नोकऱ्याही वाचतील आणि रशिया देशातच सामान बनविण्यातही सक्षम राहील.

या कंपन्यांचे घेतले नाव -पक्षाच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या एका निवेदनात, हे पाऊल टोकाचे असल्याचेही तुर्चक यांनी मान्य केले आहे. ते म्हणाले, 'हे टोकाचे पाऊल आहे, मात्र, आमच्या पाठीत कुणी सुरा भोकत असेल, तर आम्ही तेही सहन करू शकत नाही. आम्हाला आमच्या लोकांचे संरक्षण करावे लागेल. खरे तर हे एक प्रत्यक्ष युद्ध आहे. तसेच हे युद्ध केवळ रशिया विरोधात नाही, तर संपूर्ण रशिय नागरिकांच्या विरोधात आहे. आम्ही युद्धकाळातील कायद्यांनुसार, कठोर पलटवार करू.' एवढेच नाही, तर तुर्चक यांनी आपल्या निवेदनात काही कंपन्यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. यात Valio, Paulig आणि Fazer सारख्या फिनिश फूड कंपन्यांच्या नावाचाही समावेश आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनAmericaअमेरिका