शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
4
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
5
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
6
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
7
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
8
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
9
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
10
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
11
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
12
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
13
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
14
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
15
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
16
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
17
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
18
Nana Patekar : नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
19
'झिरो फिगर'च्या होण्यासाठी केलं खतरनाक डाएटिंग! तरुणी मरता मरता वाचली; भयानकच अनुभव..
20
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर

रशियानं बदला घेतला, युक्रेन जबरदस्त हादरला! ४०० हून अधिक ड्रोन अन् ४० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा कहर, झेलेन्स्की संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 16:46 IST

अमेरिका, युरोप आणि संपूर्ण जगाला आता निर्णायक दबाव आणावा लागेल. जर जागतिक नेते गप्प असतील, तर हीदेखील एक प्रकारची मिलीभगतच आहे. आता निर्णायक कारवाईची वेळ आहे, युद्ध केवळ पाठिंब्याने थांबणार नाही.

रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या २०२२ पासून सुरू असलेले युद्ध अद्यापही थांबण्याचे नाव नाही. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांचा बदला घेत आता रशियाने युक्रेनच्या जवळजवळ सर्वच प्रमुख भागांवर ४०० हून अधिक ड्रोन आणि ४० हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला. यांत, व्होलिन, लिव्हीव, टेर्नोपिल, कीव, सुमी, पोल्टावा, खमेलनित्स्की, चेरकासी आणि चेर्निहिव्ह यांचा समावेश आहे. यासंदर्भात, युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी एक्सवर भावनिक आणि संतप्त पोस्ट केली आहे. यात, युक्रेनियन हवाई दलाने अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन पाडण्यात यश मिळवले. मात्र, तीन आपत्कालीन सेवा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर ४९ जण जखमी झाले असल्याचे पुष्टी झाली आहे. ढिगारे साफ करण्याचे आणि बचाव अभियान सुरू आहे.

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की पुढे म्हणाले, रशिया आपल्या धोरणावर काय आहेत. ते सर्वसामान्यांना लक्ष्य करत आहेत. हे युद्ध आता केवळ युक्रेनचे युद्ध राहिले नाही, तर मानवतेचे युद्ध बनले आहे. रशियाला आंतरराष्ट्रीय उत्तरदायी अंतर्गत आणायला हवे. अमेरिका, युरोप आणि संपूर्ण जगाला आता निर्णायक दबाव आणावा लागेल. जर जागतिक नेते गप्प असतील, तर हीदेखील एक प्रकारची मिलीभगतच आहे. आता निर्णायक कारवाईची वेळ आहे, युद्ध केवळ पाठिंब्याने थांबणार नाही.

रशिया-युक्रेनच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय भूमिका -युक्रेनने सुरुवातीपासूनच स्पष्ट केले आहे की, ते आता एकटे लढून थकले आहे. त्यांनी, नाटो, युरोपियन युनियन, अमेरिका आणि इतर सहकारी देशांना रशियावरील आर्थिक निर्बंध आणखी कठोर करण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नाही तर, शस्त्रे आणि लष्करी संसाधनांच्या पुरवठ्याचा वेग वाढवावा, राजकीय पातळीवर दबाव आणावा आणि रशियाला वाटाघाटी करण्यासाठी राजी करावे, असेही झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनwarयुद्ध