ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला होता. तेव्हापासून पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांची चर्चा सुरू आहे. यातच आता रशियाने पुन्हा एकदा भारताला पाचव्या पिढीतील Su-57E या लढाऊ विमानाच्या एक्सपोर्ट व्हेरियंटची ऑफर दिली आहे. इस प्रस्तावात भारतीय सिस्टिम्सच्या स्थानिकीकरण आणि एकीकरणावर भर देण्यात आला आहे.
Su-57E मध्ये भारताच्या सुपर-30 जेटसाठी नियोजित प्रमुख तंत्रज्ञानाचा समावेश असेल, ज्यात GaN-आधारित AESA रडार आणि भारताने विकसित केलेल्या मिशन कॉम्प्यूटरही असेल. याचा उद्देश सुपर-30 कार्यक्रमाशी समानता सुनिश्चित करणे आहे. यामुळे भारतीय हवाई दलाला स्वदेशी पद्धतीने विकसित, हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या शस्त्र प्रणालीने (IAF) Su-57E ला सुसज्ज केले जाऊ शकेल. जे संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने भारत करत असलेल्या प्रयत्नांशी अनुरूप आहे.
महत्वाचे म्हणजे, जर भारताला हवे असेल तर भारत आपल्या गरजेनुसार Su-57E मध्ये बदलही करू शकतो. सुखोई लढाऊ विमाने बनवणाऱ्या कंपन्या देखील ते बनवू शकतात, असे रशियाने म्हटले आहे. एवढेच नाही, तर रशिया त्याचा सोर्स कोड आणि तंत्रज्ञान देण्यासही तयार आहे.
काय आहे Su-57E ची 'खासियत'? -हे फाइट जेट पाचव्या पीढीतील एक स्टील्थ फायटर जेटमध्ये असायलाच हव्यात, असा सर्व वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. हे स्लील्थ डिझाइन आहे, यामुळे ते आधुनिक रडारने डिटेक्ट करता करता येणे अवघड आहे. यामुळे हे शत्रूच्या डिटेक्शनलाही मात देऊ शकते. या फायटर जेटमध्ये लागणारी R-37 M क्षेपणास्त्रे 400 किमी. पर्यंत निशाना भेदू शकते. महत्वाचे म्हणजे, हे राफेलपेक्षाही घातक फायटर जेट आहे, असे रशियाचे म्हणणे आहे.