रशियाची राजधानी मॉस्को येथील एका हॉस्टेलमध्ये भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. ही आग सुमारे ८० चौरस मीटर परिसरात पसरली होती, ज्यामुळे हॉस्टेलमधील पाहुण्यांसमोर आपला जीव वाचवण्याचं मोठं आव्हान होतं. आग इतकी वेगाने पसरली की, अडकलेल्या अनेकांना चौथ्या मजल्यावरील खिडक्यांमधून खाली उड्या माराव्या लागल्या.
या घटनेदरम्यान, अनेक लोकांनी बेडशीट एकमेकांना बांधून दोरी तयार केली आणि त्या सहाय्याने खाली उतरण्याचा प्रयत्न केला. तर काही लोक खाली टाकलेल्या गाद्यांवर जीवाच्या आकांताने उड्या मारताना दिसले. या भयानक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण होतं. धूर आणि आगीच्या ज्वाळांमध्ये अडकलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.
उंचावरून उड्या मारल्यामुळे आणि धावपळीमुळे किमान सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. याच दरम्यान आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत.
अग्निशमन दलाने अनेक तास केलेल्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवलं आहे, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. हॉस्टेलमधील इतर पाहुण्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक पावलं उचलली जातील आणि सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली जाईल, असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं आहे.
Web Summary : A large fire broke out at a Moscow hostel, forcing guests to jump from the fourth floor. Some used makeshift ropes of bedsheets. Six people were injured and hospitalized. The fire is now under control, and the cause is under investigation.
Web Summary : मॉस्को के एक हॉस्टल में भीषण आग लगने से भगदड़ मच गई। मेहमानों को चौथी मंजिल से कूदना पड़ा। कुछ ने चादरों से रस्सी बनाई। छह लोग घायल हुए हैं। आग पर काबू पा लिया गया है, और कारण की जांच जारी है।