शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
2
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
3
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
4
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
5
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
6
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
7
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
8
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
9
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
10
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
11
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
12
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
13
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
14
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
16
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
17
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
18
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
19
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
20
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री

"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 18:45 IST

युक्रेनच्या सैन्याने कुर्स्क भागात तीन ठिकाणांहून घुसण्याचा प्रयत्न केला असून रशियाने चोख प्रत्युत्तर दिले.

Russia Ukraine War Updates: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला अडीच वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. युक्रेनच्या लष्कराने रशियाच्या पश्चिम सीमेत घुसखोरी करून कुर्स्क प्रांतातील सुमारे एक हजार किलोमीटरचा परिसर ताब्यात घेतला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, रशियन सैन्याने युक्रेनच्या सैनिकांना बाहेर काढण्यासाठी आपली कारवाई अधिक आक्रमक केली आहे. गेल्या २४ तासांत युक्रेनचे ३७० सैनिक मारले गेल्याचा दावा रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी केला आहे. तसेच आतापर्यंत, कुर्स्कमध्ये १५,३०० युक्रेनियन सैनिक मारले गेल्याचाही दावा करण्यात आला आहे.

रशियन संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, युक्रेनच्या सैन्याने कुर्स्क भागात तीन ठिकाणांहून घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर रशियन सैन्याने प्रत्युत्तराची कारवाई तीव्र केली. रशियन सैन्याच्या म्हणण्यानुसार, नाटोचा पुरवठा कुर्स्कमधील युक्रेनियन सैन्यापर्यंत पोहोचू शकला नाही. दुसरीकडे, रशिया युक्रेनच्या पूर्व सीमेवर सातत्याने आपली प्रगती वाढवत आहे आणि खार्किवला लागून असलेल्या एकामागून एक शहरे ताब्यात घेत आहेत.

रशियन सैन्याचे कुर्स्कमध्ये आक्रमण

युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशिया आणखी आक्रमक झाला आहे. रशिया युक्रेनच्या शहरांवर सातत्याने हल्ले करत आहे. रिपोर्ट्सनुसार, रशियन सैन्याने कुर्स्कमध्ये आतापर्यंत हजारो युक्रेनियन सैनिकांना ठार केले आहे आणि ते कुर्स्कला युक्रेनच्या तावडीतून सोडवण्यासाठी सतत कार्यरत आहेत. युक्रेन सातत्याने रशियावर ड्रोनने हल्ले करत आहे, मात्र बहुतांश ड्रोन हल्ले रशियाच्या हवाई संरक्षणाने हाणून पाडले आहेत. काही ड्रोन मॉस्को ऑइल रिफायनरी आणि कोनाकोवो पॉवर स्टेशनवर पडले आहेत. त्यानंतर तेथे आग लागल्याच्या अनेक बातम्या आल्या आहेत.

रशियाचा युक्रेनच्या 'नाटो' सहभागाला विरोध का?

दरम्यान, रशियाचे म्हणणे आहे की ते युक्रेनला नाटोमध्ये सामील होण्यापासून रोखू इच्छित आहेत. NATO ही २९ युरोपीय देश आणि दोन उत्तर अमेरिकन देशांमधील लष्करी युती आहे. मित्रपक्षांमध्ये शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी ते एकमेकांना मदत करतात. युक्रेन नाटो गटात सामील होण्याचा प्रयत्न करत आहे, पण रशियाचा त्याला विरोध आहे. कारण युक्रेन हा रशिया आणि पश्चिमेकडील विभागाचा महत्त्वाचा बफर झोन आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाSoldierसैनिकDefenceसंरक्षण विभाग