मॉस्को- अमेरिका आणि रशिया यांच्यामुळे शीतयुद्धाच्या काळात वेगवेगळ्या घातपाताच्या घटना घडल्या होत्या. या घटना केवळ या दोन देशांमध्य़ेच नव्हे तर त्यांच्या शेजारी देशांत किंवा इतर देशांमध्येही घडत असत. जगभरातील अनेक देश या शीतयुद्धाच्या काळामध्ये भरडले गेले. त्यांची अर्थव्यवस्थाही या बलाढ्य महासत्तांच्या लहरींवर अवलंबून होती. मात्र त्यानंतर गेली काही वर्षे यामध्ये खंड पडल्याचे चित्र निर्माण झाले. आता पुन्हा त्यांना सुरुवात झाली असावी अशी शंका आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.रशियाचे अंतराळस्थानकातून हवेची गळती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या स्पेसस्टेशनमध्ये मुद्दाम छिद्र पाडल्याची शंका रशियन अंतराळ एजन्सीच्या प्रमुखांनी व्यक्त केली आहे.
रशियाच्या स्पेस सेंटरमध्ये छिद्र; पूर्वनियोजित कट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 13:04 IST