शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रशियात अचानकपणे थांबवण्यात आले कोरोना लसीचे परीक्षण! 'हे' आहे कारण

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 30, 2020 12:22 IST

रशियन लसीचे भारतातील परीक्षण मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होऊ शकते. या लसीचे भारतात परीक्षण करत असलेली हैदराबादमधील फार्मा कंपनी डॉ. रेड्डीने म्हटले आहे, रशियन लसीचे तिसऱ्या टप्प्यावरील मानवी परीक्षण मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होईल अशी आशा आहे. (Sputnik V)

ठळक मुद्देलसीची अधिक मागणी आणि डोसची कमतरता, यांमुळे नव्या स्वयंसेवकांवरील कोरोना लसीचे परीक्षण अचानकपणे थांबवण्यात आले आहे.15 टक्के लोकांवर या लसीचे साईड इफेक्ट्स दिसून आले आहेत.पुढील वर्षात भारतात होणार रशियन लसीचे परीक्षण

मॉस्को -रशियामध्ये कोरोना लसीचे परीक्षण तुर्तास थांबवण्यात आले आहे. लसीची अधिक मागणी आणि डोसची कमतरता, यांमुळे नव्या स्वयंसेवकांवरील कोरोना लसीचे परीक्षण अचानकपणे थांबवण्यात आले आहे. यासंदर्भात अभ्यास करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधीने गुरुवारी सांगितले, की मॉस्कोच्या महत्वाकांक्षी कोरोना लसीची योजना अचानक पणे थांबवणे एक धक्का आहे.

रशियन कोरोना लस स्पुतनिक व्हीचे (Sputnik V)  85 टक्के लोकांवर कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट दिसून आले नाही. ही लस तयार करणाऱ्या गामलेया रिसर्च सेंटरचे प्रमूख अलेक्झँडर गिंट्सबर्ग यांनी सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. अलेक्झँडर म्हणाले, की 15 टक्के लोकांवर या लसीचे साईड इफेक्ट्स दिसून आले आहेत.' Sputnik V लसीचे तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण सुरू आहे.

पुढील वर्षात भारतात होणार रशियन लसीचे परीक्षण - रशियन लसीचे भारतातील परीक्षण मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होऊ शकते. या लसीचे भारतात परीक्षण करत असलेली हैदराबादमधील फार्मा कंपनी डॉ. रेड्डीने म्हटले आहे, रशियन लसीचे तिसऱ्या टप्प्यावरील मानवी परीक्षण मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होईल अशी आशा आहे. डॉ. रेड्डी मुख्य कार्यकारी अधिकारी ईरेज इस्रारायल म्हणाले, 'स्पुतनिक-व्ही लसीच्या मिडल स्टेजच्या परीक्षणासाठी पुढील काही आठवड्यात रजिस्ट्रेशनला सुरुवात होईल. आणि डिसेंबरपर्यंत हे परीक्षण पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

भारत फार्मा कंपनी सोबत करार -रशियाने आपल्या स्पुतनिक-व्ही लसीच्या फेज थ्रीच्या परीक्षणासाठी भारतीय फार्मा कंपनी डॉक्टर रेड्डी लॅब्ससोबत करार  केला आहे. या लसीच्या क्लिनिकल ट्रायलला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय)नेही परवानगी दिली आहे. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)नेही यासाठी परवानगी दिली आहे. आता देशातील एकूण 12 सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये एकाच वेळी लसीचे परीक्षण सुरू होईल. यात जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजसह पाच सरकारी तर सहा खासगी संस्थांचा समावेश आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनIndiaभारतmedicineऔषधं