शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एनएसजी सदस्यत्वासाठी रशियानं भारताला दिलं समर्थन, चीन आणि पाकला झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 17:22 IST

नवी दिल्ली- रशियानं एनएसजी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दर्शवल्यानं चीन आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा धक्का बसला आहे.

नवी दिल्ली- रशियानं एनएसजी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दर्शवल्यानं चीन आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. मॉस्कोमध्ये रशिया आणि चीनची विविध विषयांवर एक बैठक सुरू आहे. त्या बैठकीदरम्यान रशियानं हे विधान केलं आहे. एनएसजी सदस्यत्वासाठी भारताच्या दावेदारीची पाकिस्तानशी तुलना होऊ शकत नाही, असं रशियानं चीनला सुनावलं आहे. भारताच्या एनएसजी सदस्यत्वाला चीननं वारंवार विरोध केला आहे.48 सदस्य असलेल्या एनएसजी ग्रुपच्या विस्तारासाठी एक परीक्षा निवडण्यात यावी. त्यानंतरच मेरिटच्या आधारावर एखाद्या देशाला सदस्यत्व देण्यात यावं, अशी एक अट चीननं ठेवली आहे. एनएसजी ग्रुप आंतरराष्ट्रीय स्तरावर आण्विक व्यापाराला नियंत्रित करतो. भारताच्या दावेदारीला चीन नेहमीच पाकिस्तानच्या चष्म्यातून पाहतो. यासंदर्भात भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेय रायबकोव्ह यांचीही भेट घेतली होती.त्यानंतर ते म्हणाले,  एनएसजी सदस्यत्वासाठी पाकिस्तानच्या अर्जावर सर्वांची परवानगी नाही. त्यामुळे याला भारताच्या दावेदारीशी जोडलं जाऊ शकत नाही. रशियानं पहिल्यांदाच दोन प्रकरणांना एकत्र जोडण्यावर असहमती दर्शवत सार्वजनिक विधान केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एनएसजीचे सदस्यत्व मिळवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. मात्र या संघटनेच्या नियमांनुसार नवा सदस्य म्हणून भारताला प्रवेश देण्यासाठी चीनची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.मात्र अण्वस्र प्रसार  बंदी करारावर (एनपीटी) सही न केलेल्या देशास एनएसजीचे सदस्यत्व देण्यास आपला विरोध कायम असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या  हुआ चुनाइंग यांनी सांगितले होते. भारताने एनएसजी सदस्यत्वासाठी अर्ज दाखल केल्यानंतर पाकिस्ताननेही चीनच्या पाठिंब्यावर एनएसजीच्या सदस्यत्वासाठी अर्ज दाखल केला होता. भारताच्या एनएसजीमधील प्रवेशाला अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी पाठिंबा दर्शवलेला आहे. मात्र चीनने अण्वस्त्र प्रसार बंदी करारावर सह्या केल्याशिवाय कुठल्याही नव्या देशाला सदस्यत्व देऊ नये, अशी भूमिका घेतली आहे.  भारताने अणवस्त्र प्रसारबंदी (एनपीटी) करारावर अद्याप सही केलेली नाही. 

टॅग्स :russiaरशियाIndiaभारतchinaचीन