शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत...
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
4
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
5
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
6
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
7
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
8
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
9
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
10
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
11
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
12
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
13
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
14
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
15
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
18
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
19
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
20
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता

रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 12:12 IST

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध वाढत चालले आहे. रशियाने पुन्हा एकदा युक्रेनची राजधानी कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे, यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. 

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध मागील काही वर्षापासून सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी जगभरातील नेते प्रयत्नात आहेत. पण, युद्ध थांबलेलं नाही. युद्ध आणखी वाढतच आहे. आता  रशियाने पुन्हा एकदा युक्रेनची राजधानी कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

रशियन ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी कीववर मोठ्या प्रमाणात हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर कीवमधील कॅबिनेट इमारतीच्या छतावरून धूरही निघताना दिसला आहे. हा धूर हल्ल्यामुळे दिसला की इतर काही कारणाने बाहेर पडत होता हे समोर आलेले नाही.

खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद

दोन जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, कीव शहर प्रशासनाचे प्रमुख तैमूर तकाचेन्को यांनी सांगितले की, मृतांमध्ये एका वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. मुलाचा मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आला आहे. कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को म्हणाले की, रशियाने सोडलेल्या ड्रोनचा ढिगारा स्वियाटोशिंस्की जिल्ह्यातील एका निवासी इमारतीवर आणि कीवच्या डार्नित्सकी जिल्ह्यातील दुसऱ्या इमारतीवर पडला. या हल्ल्यात १० हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

एक दिवस आधी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियावर आरोप केले होते. रशियाने सप्टेंबरच्या पहिल्या सहा दिवसांत १३०० हून अधिक ड्रोन हल्ले केले आहेत, असा आरोप त्यांनी केला. याशिवाय ९०० गाईडेड एरियल बॉम्ब आणि ५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबण्याऐवजी वेग घेत आहे.

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया