शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पीएम मोदींचा रशिया दौरा; 22-23 ऑक्टोबर रोजी 16व्या BRICS शिखर परिषदेत सहभागी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 15:12 IST

Russia BRICS Summit: यंदा रशिया ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवत आहे.

Russia BRICS Summit: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 22-23 ऑक्टोबर 2024 रोजी रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी, रशियाच्या अध्यक्षतेखाली कझान येथे होणाऱ्या 16व्या ब्रिक्स परिषदेत (BRICS Summit) सहभागी होतील. "समान जागतिक विकास आणि सुरक्षिततेसाठी बहुपक्षीयता मजबूत करणे" या थीमवर यंदाची ब्रिक्स शिखर परिषद आयोजित केली आहे.

पीएम मोदी द्विपक्षीय बैठका घेणाररशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचे नेते एकत्र येणार आहेत. ‘BRICS’ने सुरू केलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी आणि भविष्यातील सहकार्यासाठी संभाव्य क्षेत्रे ओळखण्याची ही शिखर परिषद मोलाची संधी देईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. आपल्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी रशियामध्ये BRICS सदस्य देशांच्या प्रमुखांसोबत द्विपक्षीय बैठका घेऊ शकतात.

ब्रिक्स सदस्य देशरशिया यंदा ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवत आहे. ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. सौदी अरेबिया, इराण, इथियोपिया, इजिप्त, अर्जेंटिना आणि संयुक्त अरब अमिराती हे त्याचे नवीन सदस्य आहेत.

जुलैमध्ये पंतप्रधान मोदी रशियाला गेले होतेयापूर्वी 8 जुलै रोजी पंतप्रधान मोदी दोन दिवसांसाठी रशियाला गेले होते. येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल देऊन सन्मानित केले. यावर पीएम मोदींनी पुतीन यांचे आभार मानले. हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान असल्याचे ते म्हणाले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन