मध्य- पूर्वेतील युद्ध आता एका भीषण वळणावर पोहोचले आहे. इराणचे नेते अली लारीजानी यांची हत्या ही अमेरिका आणि इस्रायलने रचलेला कट असल्याचे रशियाने अधिकृतपणे जाहीर केले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून इराणला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. या भूमिकेमुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली.
क्रेमलिनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इराणसारख्या सार्वभौम राष्ट्राच्या नेत्याची अशा प्रकारे हत्या करणे, हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उघड उल्लंघन आहे. इराणी नेत्याच्या आरोग्यास हानी पोहोचवण्याचे किंवा त्यांना संपवण्याचे कोणतेही प्रयत्न रशियाला मान्य नाहीत, अशा कडक शब्दांत रशियाने अमेरिका आणि इस्रायलचा निषेध केला.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी या हल्ल्यांना पूर्वनियोजित कट म्हटले. रशियाच्या मते, अमेरिका आणि इस्रायल हे जाणीवपूर्वक इराणमधील सत्ता उलथवून टाकण्याचा किंवा तिथली राजवट अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. रशियाने दोन्ही देशांना तात्काळ हल्ले थांबवून युद्धविरामाची चर्चा करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.
अध्यक्ष पुतिन यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या हत्येचा निषेध केला असून इराणचे नवीन सर्वोच्च नेते म्हणून मोजतबा खामेनी यांच्या नियुक्तीचे रशियाने स्वागत केले. या कठीण काळात रशिया इराणच्या पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही पुतिन यांनी दिली. मध्य पूर्वतील युद्ध थांबवण्यासाठी पुतिन यांनी आखाती देशांच्या इतर नेत्यांशी फोनवर चर्चा केली.
Web Summary : Russia condemns the assassination of Iranian leader by US and Israel, pledging support to Iran. Putin calls for ceasefire talks, disapproving external interference.
Web Summary : रूस ने ईरान के नेता की अमेरिका और इजरायल द्वारा हत्या की निंदा की, ईरान को समर्थन का वादा किया। पुतिन ने युद्धविराम वार्ता का आह्वान किया, बाहरी हस्तक्षेप को अस्वीकार किया।