युद्धविरामाच्या चर्चेदरम्यान रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला आहे. या भीषण हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
रशिया-युक्रेन संघर्षाला चार वर्षे पूर्ण होत असताना, कीवचे मित्र राष्ट्रे रशियाविरुद्ध कठोर पावले उचलण्याची तयारी करत आहेत. कीव लष्करी प्रशासनाचे प्रमुख त्काचेंको यांनी शनिवारी सांगितलं की, युक्रेनची राजधानी कीववर झालेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आणि जवळपास नऊ जण जखमी झाले आहेत.
युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमुळे एका अनिवासी इमारतीत भयंकर आग लागली, तर अडवलेल्या क्षेपणास्त्रांचा ढिगारा दुसऱ्या भागात पडला, ज्यामुळे जवळच्या इमारतींच्या खिडक्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलं की, राजधानीत स्फोट झाले आहेत आणि शहरावर बॅलिस्टिक हल्ला होत आहे. याच दरम्यान, ट्रल-ईस्ट ड्नीप्रोपेत्रोव्स्क प्रदेशात, कार्यकारी गव्हर्नर व्लादिस्लाव हॅवानेन्को यांनी सांगितलं की रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू आणि सात जण जखमी झाले. तसेच हल्ल्यात अनेक निवासी इमारती, घरं, दुकानं आणि वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.
Web Summary : Russia launched a major drone and missile attack on Ukraine amid ceasefire talks, killing four and injuring many. Kyiv and Dnipropetrovsk region were hit, causing extensive damage to residential buildings and infrastructure. International allies are preparing stronger measures against Russia.
Web Summary : युद्धविराम वार्ता के बीच रूस ने यूक्रेन पर बड़ा मिसाइल और ड्रोन हमला किया, जिसमें चार की मौत हो गई और कई घायल हो गए। कीव और नीप्रोपेत्रोव्स्क क्षेत्र में आवासीय इमारतों और बुनियादी ढांचे को व्यापक नुकसान हुआ। अंतर्राष्ट्रीय सहयोगी रूस के खिलाफ कड़े कदम उठाने की तैयारी कर रहे हैं।