शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीला भेटायला गेला अन् चोरीच्या आरोपात अडकला; सैनिकाला ४ वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 13:31 IST

रशियन शहरातील व्लादिवोस्तोक येथील न्यायालयाने बुधवारी एका ३४ वर्षीय अमेरिकन सैनिकाला चोरी आणि खुनाची धमकी दिल्याच्या आरोपाखाली शिक्षा सुनावली आहे.

रशिया आणि अमेरिका यांच्यातील संबंधात बराच दुरावा निर्माण झाला आहे. दरम्यान रशियन कोर्टाने एका अमेरिकन सैनिकाला चोरीच्या आरोपाखाली चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिकच ताणले गेले आहेत. रशियन शहरातील व्लादिवोस्तोक येथील न्यायालयाने बुधवारी एका ३४ वर्षीय अमेरिकन सैनिकाला चोरी आणि खुनाची धमकी दिल्याच्या आरोपाखाली शिक्षा सुनावली आहे.

गॉर्डन ब्लॅक असे या अमेरिकन सैनिकाचे नाव असून तो आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी रशियाच्या व्लादिवोस्तोक शहरात गेला होता. या सैनिकावर त्याच्या प्रेयसीने चोरीचा आरोप केला आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अटकेनंतर गॉर्डन ब्लॅक याला न्यायलयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीशांनी गॉर्डन ब्लॅकला दहा हजार रूबल म्हणजेच अंदाजे ९ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

सैनिक रशियात कसा पोहोचला?गॉर्डन ब्लॅक रजेवर होता आणि तो दक्षिण कोरियाहून टेक्सास येथील फोर्ट कावाझोसमधील आपल्या बेसवर परतणार होता, जिथे तो कॅम्प हम्फ्रेज येथे सैन्यासह तैनात होता. लष्कराच्या प्रवक्ता सिंथिया स्मिथ यांनी सांगितले की, गॉर्डन ब्लॅकने मायदेशी परतण्यासाठी साइन आउट केले होते, परंतु तो त्याच्या घरी पोहोचला नाही. त्याऐवजी गॉर्डन ब्लॅक आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी चीनमार्गे रशियाच्या व्लादिवोस्तोक शहरात पोहोचला होता.

प्रेयसीकडून चोरीचा आरोपप्रेयसीला भेटायला गॉर्डन ब्लॅक आला. मात्र, प्रेयसीनेच गॉर्डन ब्लॅकवर चोरीचा आरोप केला. प्रेयसी अलेक्झांड्रा वॉशचुकने सांगितले की, गॉर्डन ब्लॅक आणि तिच्यामध्ये घरगुती वाद झाला होता. यादरम्यान गॉर्डन ब्लॅक चिडला आणि मारहाण केली. तसेच, गॉर्डन ब्लॅकने माझ्या पर्समधून पैसे चोरले, असे अलेक्झांड्रा वॉशचुकने सांगितले. अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, गॉर्डन ब्लॅक विवाहित होता आणि तो दक्षिण कोरियामध्ये त्याच्या प्रेयसीला भेटला होता.

रशियाच्या तुरुंगात अनेक अमेरिकन रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे रशिया आणि अमेरिका यांच्यात बराच तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर आता अमेरिकन सैनिकाच्या अटकेनंतर दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडले. कॉर्पोरेट सुरक्षा कार्यकारी पॉल व्हेलन, वॉल स्ट्रीट जर्नलचे रिपोर्टर इव्हान गेर्शकोविच आणि संगीतकार ट्रॅव्हिस लीक यांच्यासह अनेक अमेरिकन नागरिकांना रशियाने तुरुंगात टाकले आहे. दरम्यान, या अमेरिकन नागरिकांना रशियन सरकारने चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतल्याचे अमेरिकन सरकारचे म्हणणे आहे. तसेच या नागरिकांच्या सुटकेसाठी अमेरिकन सरकार वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत आहे.

रशियाला जाण्याची परवानगी नाहीया घटनेनंतर आता अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकन नागरिकांना रशियात न जाण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकन संरक्षण विभाग पेंटागॉनच्या धोरणानुसार, कोणत्याही आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सैनिकांना सुरक्षा व्यवस्थापक किंवा कमांडरकडून परवानगी घ्यावी लागेल. पण  गॉर्डन ब्लॅकने रशियात जाण्यासाठी परवानगी मागितली नसल्याचे अमेरिकन लष्कराने म्हटले आहे.

टॅग्स :jailतुरुंगAmericaअमेरिकाrussiaरशियाCrime Newsगुन्हेगारी