शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 16:46 IST

Russia Nuclear Bomb warning to America: रशिया पाश्चिमात्य देशांच्या कोणत्याही हल्ल्याला जशास तसे प्रत्युत्तर देऊ शकते, असेही पुतिन म्हणाले.

Russia Nuclear Bomb warning to America: रशिया पाश्चिमात्य देशांच्या कोणत्याही इशाऱ्याला किंवा हल्ल्याला जशास तसे प्रत्युत्तर देऊ शकते, आमच्याकडचे अणुबॉम्ब नेहमीच सज्ज असतो, असे मोठे विधान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केले. रशियाच्या वार्षिक विजय परेडमध्ये बोलताना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी ब्रिटन आणि अमेरिकेवर जोरदार टीका केली. सध्या रशिया आणि पाश्चिमात्य देश यांच्यात शीतयुद्ध सुरु असून तणाव वाढत चालला आहे. याबाबत बोलताना, पुतिन यांनी रशियाच्या अण्विक सामर्थ्याचा उल्लेख करत इतर बड्या देशांना इशारा दिला. तसेच दुसऱ्या महायुद्धातील ब्रिटनच्या भूमिकेबद्दल पुतीन यांनी जोरदार टीका केली. 1945 मध्ये दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या पराभव झाला. त्याच्या स्मरणार्थ रशियात 9 मे रोजी एक परेड आयोजित केली जाते. या परेडमध्ये पुतीन यांनी रशियाच्या अणुशक्तीबाबतचा इशारा दिला.

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी विजय परेडमधील भाषणात अमेरिका, ब्रिटन आणि पाश्चात्य देशांना स्पष्ट इशारा दिला आणि सांगितले की रशिया अण्वस्त्रांनी सज्ज आहे. ते म्हणाले, "विजय दिवस आपल्या पिढ्यांना एकत्र आणतो. आम्ही शतकानुशतके जुन्या परंपरांचा आदर ठेवत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की एकत्रितपणे आम्ही रशियाचे स्वतंत्र आणि सुरक्षित भविष्य सुनिश्चित करू. रशिया जागतिक संघर्ष रोखण्यासाठी सर्व काही करेल परंतु रशियाला उगाचच कोणीही डिवचू नये. आमचे सामरिक सैन्य नेहमीच युद्धासाठी तयार असते. रेड स्क्वेअरमधील कार्यक्रमात पुतिन यांनी त्यांची आण्विक ब्रीफकेस देखील धरली आणि तीन विशाल यार्स आण्विक क्षेपणास्त्र प्रक्षेपकांचे प्रात्यक्षिकही करण्यात आले.

रशियाला शांततापूर्ण भविष्य हवे आहे परंतु पाश्चात्य उच्चभ्रू देश रशियाचा द्वेष करतात. त्यांना 'रशियाफोबिया' झाला आहे. रशियाच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी विविध प्रकारे पावले उचलली जात आहेत, परंतु रशिया त्यांच्याशी लढत राहिल आणि आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास कटिबद्ध आहे, असे पुतीन यांनी ठणकावले.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाAmericaअमेरिकाnuclear warअणुयुद्ध