रशिया आणि युक्रेन युद्ध अद्यापही थांबलेले नाही. रशियाने आता पुन्हा एकदा युक्रेनला लक्ष्य केले. खरे तर, यावेळी रशियाने युक्रेनवर मिसाईल आणि ड्रोनच्या सहाय्याने आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला आहे. रशियाच्या या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया आली आहे. ट्रम्प पुतिन यांच्यावर नाराज असल्याचे दिसून आले. या हल्ल्यात रशियाने 367 ड्रोन आणि मिसाइल्सचा वापर केल्याचे समजते.
रशियाच्या या कारवाईसंदर्भात बोलताना ट्रम्प म्हणाले, "मी पुतीन यांच्यावर नाराज आहे. लोक मरत आहेत. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. आमचे चांगले संबंध आहेत. मात्र, आता ते रॉकेट्स डागत आहेत. हे मला अजिबात मान्य नाही. ते क्रेझी व्यक्ती आहेत. हे योग्य नाही." एवढेच नाही, तर ट्रम्प यांनी पुतीन यांच्यासाठी 'व्हाट द हेल' सारखे शब्दही वापरले.
हवाई हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये घबराट -एनएसके वर्ल्ड जपानच्या मते, युक्रेनमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात किमान १२ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यासाठी रशियाने २९८ ड्रोन आणि ६९ क्षेपणास्त्रांचा वापर केला. या हल्ल्यानंतर संपूर्ण युक्रेनमध्ये घबराटीचे वातावरण आङे.क्रेनच्या अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात बोलताना, आपण ४५ क्षेपणास्त्रे पाडली असून २६६ ड्रोन देखील नष्ट केल्याचे युक्रेनियन हवाई दलाने म्हटले आहे. या हल्ल्यात कीव शहराचे मोठे नुकसान झाले आहे. या दोन्ही देशातील युद्ध अद्यापही थांबलेले नाही.
झेलेंस्की संदर्भात काय म्हणाले ट्रम्प...? -ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमाने युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्यावरही निशाणा साधला. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात, झेलेन्स्की यांची चर्चेची पद्धत देशाचे भले करू शकत नाही. त्यांच्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द समस्या वाढवत आहे. मला हे बरे वाटत नाही. हे थांबवायला हवे.