अमेरिकेतील पार्कमध्ये 'न्यूड' डोनाल्ड ट्रम्प पाहण्यासाठी गर्दी
By Admin | Updated: August 19, 2016 13:05 IST2016-08-19T11:26:15+5:302016-08-19T13:05:24+5:30
अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा नग्न पुतळा शहरातील एका पार्कमध्ये उभा करण्यात आला होता

अमेरिकेतील पार्कमध्ये 'न्यूड' डोनाल्ड ट्रम्प पाहण्यासाठी गर्दी
>- ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 19 - अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा नग्न पुतळा शहरातील एका पार्कमध्ये उभा करण्यात आला होता. हा पुतळा उभारल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे थोड्या वेळानंतर हा पुतळा हटवण्यात आला. हा पुतळा लावण्यासाठी परवानगी घेण्यात आली नसल्याने हा हटवत असल्याचं कारण सरकारी अधिका-यांनी दिलं. काही कलाकारांच्या एका गटाने हा पुतळा उभारण्याची जबाबदारी घेतली आहे.
मॅनहॅटन येथील युनिअन स्क्वेअर पार्कमध्ये लावण्यात आलेला हा नग्न पुतळा पाहून अनेक लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं. 'द एम्परर हॅज नो बॉल्स' असं नावदेखील या पुतळ्याला देण्यात आलं होतं. शहरातील कोणत्याही पार्कात विना परवानगी पुतळा उभारणं बेकायदेशीर आहे, त्यामुळेच हा पुतळा हटवल्याचं सांगण्यात येत आहे.
कलाकार, संगीतकार आणि दिग्दर्शकांचा गट 'इनडिक्लाईन' यांनी हा पुतळा उभारण्याची जबाबदारी घेतली असून आपण लॉस एंजेलिस, सिएटल, क्लीवलँड आणि सॅन फ्रान्सिस्को शहरांमध्ये असे पुतळे उभारल्याचं त्यांनी सांगितलं आहे. जिंजर नावाच्या एका कलाकाराने हे पुतळे बनवण्यात आले आहेत.