शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 23:00 IST

या चकमकीत पत्रकारांसह 10 जण जखमी झाले आहेत. यांपैकी पाच जणांवर सीएमसीएचमध्ये उपचार सुरू आहेत.

चितगाव कोर्ट बिल्डिंग परिसरात आज (२६ नोव्हेंबर) पोलीस आणि चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थकांमध्ये चकमक उडाली. दरम्यान एका वकिलाचा मृत्यू झाला. 32 वर्षीय सैफुल इस्लाम असे मृताचे नाव असून तो चितगाव जिल्हा बार असोसिएशनचा सदस्य होता. सीएमसीएच पोलीस कॅम्पचे प्रभारी नूरुल इस्लाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला चितगाव मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मृत घोषित केले.

बांगलादेशी वेबसाइट द डेली स्टारनुसार, चिन्मय दास यांच्या अटकेनंतर परिस्थिती आणखी चिघळताना पाहून पोलीस आणि बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या (BGB) जवानांनी व्हॅनचा मार्ग मोकळा करण्यासाठी साउंड ग्रेनेड डागले आणि लाठीचार्ज केला. चट्टोग्राम जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष नाझिम उद्दीन चौधरी यांनी प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने डेली स्टारला दिलेल्या माहितीनुसार, "चकमकीदरम्यान, न्यायालयाच्या आवारात निदर्शने करणाऱ्या काही चिन्मय समर्थकांनी दुपारी 3.30 च्या सुमारास सैफुलला रंगम कन्व्हेन्शन हॉलमध्ये ओढले आणि त्याच्यावर हल्ला केला."

चकमकीत पत्रकारांसह 10 जण जखमी -गोलम रसूल मार्केटमधील कर्मचारी मोहम्मद दीदार आणि इतर काही स्थानिकांनी सैफुलला वाचवले आणि रुग्णालयात नेले. रंगम कन्व्हेन्शन हॉलच्या शेजारी असलेल्या रस्त्यावर चिन्मय यांच्या काही समर्थकांनी वकिलावर हल्ला केला. या चकमकीत पत्रकारांसह 10 जण जखमी झाले आहेत. यांपैकी पाच जणांवर सीएमसीएचमध्ये उपचार सुरू आहेत.

न्यायालयाने चिन्मय दास यांचा जामीन फेटाळला - तत्पूर्वी, महानगर दंडाधिकारी काझी शरीफुल इस्लाम यांनी सनातनी जागरण जोतचे प्रवक्ते चिन्मय दास यांना बांगलादेशी राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याच्या आरोपावरून तुरुंगात पाठवले. दुपारी बाराच्या सुमारास न्यायालयाच्या आदेशानंतर लगेचच त्याच्या समर्थकांनी निदर्शने सुरू केली आणि चितगाव इस्कॉनचे माजी विभागीय संघटक सचिव चिन्मय यांना घेऊन जाणाऱ्या जेल व्हॅनला रोखण्याचा प्रयत्न केला. हे थांबवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि साउंड ग्रेनेडचा वापर केला. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशHinduहिंदूPoliceपोलिस