शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

8 मिनिटांत 900 कोटींची चोरी; कमकुवत पासवर्डमुळे झाली सर्वात मोठी चोरी, जाणून घ्या प्रकरण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 16:19 IST

या चोरीच्या घटनेची जगभरात चर्चा सुरू आहे.

जगातील सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक संग्रहालयांपैकी एक असलेले फ्रान्समधील "लूव्र म्युझियम"  पुन्हा एकदा सुरक्षेच्या त्रुटींमुळे चर्चेत आले आहे. 19 ऑक्टोबर रोजी दिवसाढवळ्या  येथे घडलेल्या चोरीच्या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. तपासानुसार, संग्रहालयातील सुरक्षा व्यवस्था केवळ जुनीच नव्हती, तर सायबर सिक्युरिटीच्या दृष्टीने अत्यंत कमजोर असल्याची माहिती समोर आली आहे. 

फक्त LOUVRE टाइप करून मिळाला सर्व्हरचा अ‍ॅक्सेस!

फ्रेंच वृत्तसंस्था लिब्रेशनच्या अहवालानुसार, लूव्रमध्ये वापरला जाणारा सुरक्षा नेटवर्क आणि व्हिडिओ सर्व्हिलन्स सिस्टम दशकांपासून अद्ययावत करण्यात आली नव्हती. इतकेच नव्हे, तर LOUVRE हा शब्द टाइप केल्यावर संग्रहालयाच्या व्हिडिओ सर्व्हिलन्स सर्व्हरला अ‍ॅक्सेस मिळत होता. त्याचप्रमाणे THALES टाइप केल्यास थेल्स ग्रुपने तयार केलेला दुसरा सुरक्षा सॉफ्टवेअर उघडत होता.

2014 पासूनच मिळत होत्या चेतावण्या

डिसेंबर 2014 मध्ये फ्रान्सच्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा संस्थेने (ANSSI) या म्युझियमच्या सुरक्षा नेटवर्कचा ऑडिट अहवाल सादर केला होता. 26 पानांच्या या अहवालात अनेक गंभीर त्रुटी दाखवून देण्यात आल्या होत्या. या नेटवर्कमध्ये अलार्म सिस्टीम, व्हिडिओ मॉनिटरिंग आणि प्रवेश नियंत्रण या सगळ्याच गोष्टींचा समावेश होता. एजन्सीने स्पष्ट इशारा दिला होता की, कमजोर पासवर्ड आणि जुना नेटवर्क सॉफ्टवेअरमुळे हॅकर्सना सहज प्रवेश मिळू शकतो आणि ते व्हिडिओ फीड किंवा एक्सेस कंट्रोल बदलू शकतात.

संग्रहालयाने योग्य पाऊले उचलली नाही

एजन्सीने त्या वेळी पासवर्ड मजबूत करण्याचा आणि सिस्टम अपग्रेड करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, म्युझियम प्रशासनाने या सूचनांनंतर प्रत्यक्षात काय बदल केले, याबाबत त्यांनी कधीही सार्वजनिक माहिती दिली नाही. 2017 मधील आणखी एका ऑडिटमध्येही अशाच त्रुटी आढळल्या होत्या, म्हणजेच समस्या कायम राहिली होती.

फक्त 8 मिनिटांत 900 कोटींची चोरी

19 ऑक्टोबर रोजीच्या चोरीने तर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. चार चोरांनी केवळ 8 मिनिटांत 8.8 मिलियन युरो (सुमारे 900 कोटी रुपये) किमतीचे दागिने लुटले. ही संपूर्ण घटना एखाद्या चित्रपटासारखी वाटावी अशी होती. चोरांनी बास्केट लिफ्टद्वारे भिंतीवर चढून, खिडकी तोडून, डिस्प्ले केसमधील दागिने काढले आणि क्षणात फरार झाले. या चोरीच्या तपासात काही संशयितांना अटक करण्यात आली आहे, परंतु घटनेने म्युझियमच्या सुरक्षा यंत्रणांवर आणि व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Louvre Heist: Weak Password Enabled $90 Million Theft in Minutes

Web Summary : The Louvre Museum suffered a $90 million theft due to weak cyber security. A simple password granted server access. Warnings about vulnerabilities were ignored, leading to the audacious 8-minute heist.
टॅग्स :RobberyचोरीFranceफ्रान्सtheftचोरी