नेपाळला ६ हजार कोटींचे कर्ज
By Admin | Updated: August 4, 2014 04:02 IST2014-08-04T04:02:18+5:302014-08-04T04:02:18+5:30
सोबतच दोन्ही देशांदरम्यान दरी नको तर सेतू उभारण्यावर भर देत नेपाळच्या विकासासाठी ‘हिट’ (हायवेज, आयवेज व ट्रान्सवेज) मंत्र दिला.

नेपाळला ६ हजार कोटींचे कर्ज
काठमांडू : भारत-नेपाळच्या द्विपक्षीय संबंधांना नवीन आयाम देण्याच्या उद्देशातहत नेपाळच्या पहिल्याच भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करण्याची भारताची इच्छा नसल्याची ग्वाही देत नेपाळला सहा हजार १०० कोटी रुपयांचे सवलतीचे कर्ज देण्याची घोषणा केली. सोबतच दोन्ही देशांदरम्यान दरी नको तर सेतू उभारण्यावर भर देत नेपाळच्या विकासासाठी ‘हिट’ (हायवेज, आयवेज व ट्रान्सवेज) मंत्र दिला.
नेपाळच्या घटनासभेतील भाषणात मोदी यांनी स्पष्ट केले की, नेपाळच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करण्याची भारताची इच्छा नाही. जो मार्ग निवडणार, त्यासाठी सहकार्य असेल.