ब्रिटनच्या राजघराण्यात पहिल्यांदाच होणार समलैंगिक विवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 03:48 PM2018-06-19T15:48:44+5:302018-06-19T15:48:44+5:30

हे लग्न ऐतिहासिक असलं तरी यापूर्वी कधीही असं लग्न या राजघराण्यात झालं नाही. त्यामुळे सध्या या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. 

The Royal Family is about to have its first gay Wedding | ब्रिटनच्या राजघराण्यात पहिल्यांदाच होणार समलैंगिक विवाह

ब्रिटनच्या राजघराण्यात पहिल्यांदाच होणार समलैंगिक विवाह

Next

इंग्लंड : काही दिवसांपूर्वीच प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलचा विवाह धडाक्यात झाल्यानंतर पुन्हा एकदा ब्रिटनच्या राजघराण्यात आणखी एक ऐतिहासिक विवाह होणार आहे. हे लग्न ऐतिहासिक असलं तरी यापूर्वी कधीही असं लग्न या राजघराण्यात झालं नाही. त्यामुळे सध्या या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. 

डेलिमेल आणि मिरर ने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ व्दितीयचे चुलत भाऊ लॉर्ड इवार माऊंटबॅटन आपला समलैंगिक साथीदार जेम्स कोयलसोबत लग्न करणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या राजघराण्यात पहिल्यांदाच असा समलैंगिक विवाह अधिकृतपणे होत आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, लॉर्ड इवार माऊंटबॅटन यांनी साधारण 2 वर्षांपूर्वी 2016 मध्ये ते समलैंगिक असल्याची जाहीर घोषणा केली होती. आश्चर्याची बाब म्हणजे 24 वर्षांपूर्वी त्यांनी पेनी नावाच्या महिलेशी लग्न केले होते. नंतर 2010 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. कारण त्या लग्नात त्यांना काहीच सहज वाटत नव्हतं. 

घटस्फोटांनंतर माऊंटबॅटन यांनी सांगितले होते की, 'मला आनंद आहे की, माझी समस्या माझ्या पत्नीने जाणली आणि मला मदत केली'.  पेनी आणि माऊंटबॅटन हे आजही चांगले मित्र आहेत. पेनी माऊंटबॅटन यांच्या या समलैंगिक लग्नातही सहभागी होणार आहे. पहिल्या लग्नातून त्यांना तीन अपत्ये आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राजघराण्यात प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचा विवाह झाला. या लग्नाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. पण लॉर्ड इवार माऊंटबॅटन यांच्या लग्नाची तारीख समोर आली नाहीये. तसंच त्यांचा विवाह मोठ्या धडाक्यात होणार नाहीये. फार खाजगी स्वरूपात हा विवाह होणार आहे. 
 

Web Title: The Royal Family is about to have its first gay Wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.