शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

22 जानेवारीपासून रोहिंग्यांना माघारी पाठवण्याच्या योजनेला होणार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 12:16 IST

बांगलादेशात पळून गेलेल्या लक्षावधी रोहिंग्यांना पुन्हा राखिन प्रांतामध्ये आणण्याच्या योजनेला 22 जानेवारीपासून सुरुवात होणार असल्याची माहिती म्यानमारचे समाजकल्याण, पुनर्वसन मंत्री डॉ. विन म्यात आये यांनी दिली आहे.  

ठळक मुद्देराखिन प्रांताच्या वायव्य भागात ताउंगप्योलेवेइ येथे बांगलादेशातून येणाऱ्या लोकांसाठी छावणी उभी करण्यात आली आहे संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार जुलैपासून 6 लाख लोकांनी राखिन प्रांत सोडून पलायन केले आहे. त्यातील बहुतांश लोक रोहिंग्या मुस्लीम होते.

रंगून- म्यानमारमधून बांगलादेशात पळून गेलेल्या लक्षावधी रोहिंग्यांना पुन्हा राखिन प्रांतामध्ये आणण्याच्या योजनेला 22 जानेवारीपासून सुरुवात होणार असल्याची माहिती म्यानमारचे समाजकल्याण, पुनर्वसन मंत्री डॉ. विन म्यात आये यांनी दिली आहे.  म्यानमारची राजधानी न्या पि डॉं येथे म्यानमार सरकार आणि म्यानमार मानवाधिकार आयोगाच्या बैठकीनंतर मंत्री विन यांनी ही घोषणा केली आहे. 22 जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यामध्ये 450 हिंदूंना परत म्यानमारमध्ये आणले जाणार आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या जाळपोळ, दंगल, हत्या आणि गुन्ह्यांच्या सत्रामध्ये रोहिंग्याबरोबर हिंदू आणि इतर समुदायांचे लोकही राखिन प्रांत सोडून निघून गेले होते. संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार जुलैपासून 6 लाख लोकांनी राखिन प्रांत सोडून पलायन केले आहे. त्यातील बहुतांश लोक रोहिंग्या मुस्लीम होते. रोहिंग्यांच्या प्रत्यावर्तनासाठी बांगलादेश आणि म्यानमार यांच्यामध्ये करार करण्यात आला आहे.राखिन प्रांताच्या वायव्य भागात ताउंगप्योलेवेइ येथे बांगलादेशातून येणाऱ्या लोकांसाठी छावणी उभी करण्यात आली आहे. रस्ते मार्गाने येणाऱ्या निर्वासितांना तेथे आणण्यात येईल तर न्गाखुया, मंगडौ येथे समुद्र आणि इतर जलमार्गाने येणाऱ्या रोहिंग्यांना आणण्यात येइल.

रोहिंग्यांनी स्थलांतर केले होते ?बांगलादेशात गेलेल्या रोहिंग्यांप्रमाणेच दोन वर्षांपुर्वी त्रास वाचविण्यासाठी हजारो रोहिंग्या मुसलमानांनी मिळेल त्या बोटींनी म्यानमारचा किनारा सोडला होता. थायलंड, इंडोनेशिया अशा कोणत्याही दिशांना त्यांच्या बोटी गेल्या. दोन तीन महिन्यांहून अधिक काळ बोटींवर काढल्यानंतर काहींच्या बोटी थायलंडच्या किनाऱ्याला लागल्या. त्यांना निर्वासितांच्या छावण्यांमध्ये ठेवले गेल. मात्र अजूनही शेकडो रोहिंग्या थायलंड, इंडोनेशिया आसरा देईल अशा अपेक्षेत फिरतच आहेत. या बोटी म्हणजे बंगालच्या उपसागरात तरंगणाऱ्या शवपेट्याच झाल्या आहेत. हे गरिब लोक कोणालाच नको आहेत. शांततेचे नोबेल मिळविणाऱ्या आंग सान सू की यांनीही या प्रश्नावर मौन धारण केले आहे. बौद्ध धर्मियांचे सर्वोच्च गुरु दलाई लामा यांनीही यामध्ये हस्तक्षेप करुन हा प्रश्न सोडावावा अशी विनंती केली होती, मात्र तरिही म्यानमारने यावर ठोस भूमिका घेतली नाही. सुमारे १३ लाख लोकसंख्येचा असणारा रोहिंग्या हा एक मुस्लीम संप्रदाय आहे. म्यानमारमधील राखिने प्रांतात यांची सर्वात जास्त वस्ती होती. मात्र म्यानमारने या मुस्लीमांना नागरिकत्व देण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे म्यानमारमध्ये त्यांच्यावर शिक्षण, विवाह, जमिन अधिग्रहण अशा अनेक क्षेत्रांवर बंधने लादली आहेत. स्थानिक बौद्ध व रोहिंग्या यांचे संबंधही नेहमीच तणावाचे राहिले आहेत. वांशिक आणि भाषिक कारणांमुळे या दोन्ही गटांमध्ये नेहमीच संघर्ष झालेला आहे. २०१२ साली दोन्ही वांशिक गटांमध्ये झालेल्या संघर्षामध्ये शेकडो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आणि सुमारे एक लाख चाळीस हजार नागरिकांना घरे सोडावी लागली.

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याMyanmarम्यानमारInternationalआंतरराष्ट्रीय