शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नारायण मूर्तींच्या जावईबापूंची मोठी कीर्ती; झाले ब्रिटनचे अर्थमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 21:18 IST

ब्रिटनच्या तिजोरीच्या किल्ल्या भारतीय वंशाच्या तरुणाच्या हाती आल्या आहेत.

लंडन - ब्रिटनच्या तिजोरीच्या किल्ल्या भारतीय वंशाच्या तरुणाच्या हाती आल्या आहेत. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या वित्तमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सुनक यांना आपल्या मंत्रिमंडळात ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. ऋषी सुनक हे इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचे खाते सांभाळणारे ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे दुसरे व्यक्ती ठरले आहेत. या मंत्रिमंडळात समावेश असलेल्या प्रीती पटेल यांच्याकडे सध्या ब्रिटनच्या गृहमंत्रालयाची जबाबदारी आहे.  तत्पूर्वी ब्रिटनच्या वित्तमंत्रालयाची जबाबदारी पाकिस्तानी वंशाचे साजिद जाविद यांच्याकडे होती. त्यांनी हल्लीच राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ऋषी सुनक यांची वित्तमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे. 

डिसेंबरमध्ये झालेल्या ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षाने विजय मिळवला होता. त्यानंतर जॉन्सन यांनी आपल्या मंत्रिमंडळात काही महत्त्वपूर्ण बदल केले होते. ३९ वर्षीय ऋषी सुनक हे गोल्डमॅन सॅशमध्ये बँकर म्हणून कार्यरत होते.  

टॅग्स :Englandइंग्लंडGovernmentसरकारIndiaभारतInfosysइन्फोसिस