शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 18:26 IST

इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून सुरू झालेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने वेस्ट नुसा टेंगारा पेकालोंगन आणि सिरेबॉनच्या विधानसभा इमारतींना आग लावली.

इंडोनेशियात लोकप्रतिनिधींच्या वेतनावरून गोंधळ सुरू झाला आहे. संतप्त जमावाने तीन प्रांतांच्या विधानसभा इमारतींना आग लावली. यामध्ये पश्चिम नुसा तेंगारा, पेकालोंगन आणि सिरेबॉनच्या विधानसभा इमारतींचा समावेश आहे. या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले.

निदर्शकांनी सुराबाया येथील पोलिस मुख्यालयावरही हल्ला केला. सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या तोफांचा मारा केला. निदर्शकांनी फटाके आणि लाठ्याकाठ्यांनी प्रत्युत्तर दिले. 

७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार

पोलिस आणि निदर्शकांमध्ये संघर्ष

देशात आधीच वाढती बेरोजगारी, कर यातच लोकप्रतिनिधींचा नवीन भत्ता. याविरोधात लोक निदर्शने करत होते. दरम्यान, अन्न वितरण करणाऱ्या एका दुचाकीस्वाराला पोलिसांच्या वाहनाने धडक दिल्याने आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर निदर्शने व्यापक आणि हिंसक झाली. यानंतर, अनेक शहरांमध्ये पोलिस आणि निदर्शकांमध्ये संघर्ष सुरू झाला.

आमदारांच्या पगारावरून निषेध

सोमवारपासून जकार्तामध्ये हे आंदोलन सुरू झाले. सर्व खासदारांना त्यांच्या पगाराव्यतिरिक्त दरमहा ५० दशलक्ष रुपया गृहनिर्माण भत्ता मिळतो. हे गेल्या वर्षी सुरू करण्यात आले होते. हे जकार्तातील किमान वेतनाच्या सुमारे १० पट आहे.

टॅग्स :Indonesiaइंडोनेशियाfireआग