ब्राझीलच्या तुरुंगात दंगल : २५ कैदी ठार

By Admin | Updated: October 18, 2016 04:58 IST2016-10-18T04:58:33+5:302016-10-18T04:58:33+5:30

रोरैमा राज्याची राजधानी बोआ विस्ताच्या तुरुंगातील संघर्षामध्ये ७ कैद्यांचे मुंडके धडापासून वेगळे करण्यात आले

Riot in Brazil jail: 25 prisoners killed | ब्राझीलच्या तुरुंगात दंगल : २५ कैदी ठार

ब्राझीलच्या तुरुंगात दंगल : २५ कैदी ठार


साओ पाऊलो : उत्तर ब्राझीलमधील एका तुरुंगात दोन गटांमध्ये दंगल उडून २५ कैदी ठार झाले.रोरैमा राज्याची राजधानी बोआ विस्ताच्या तुरुंगातील संघर्षामध्ये ७ कैद्यांचे मुंडके धडापासून वेगळे करण्यात आले, तर ६ जणांचा जळाल्याने मृत्यू झाला. एका विभागातील कैदी दुसऱ्या विभागात घुसण्याचा प्रयत्न करीत असताना हा संघर्ष उडाला.
यावेळी हजर असलेल्या एका कैद्याच्या पत्नीने सांगितले की, कैद्यांजवळ चाकू, लाठ्या-काठ्या होते. कैद्यांना त्यांच्या कुटुंबियांनी भेटण्याच्या वेळेसच हा संघर्ष उडाला होता. त्यामुळे कैद्यांच्या शंभरावर कुटुंबियांना काही वेळासाठी ओलिस ठेवण्यात आले होते.दंगेखोरांची मागणी होती की, त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी न्यायाधीशांना बोलावण्यात यावे. (वृत्तसंस्था)

Web Title: Riot in Brazil jail: 25 prisoners killed