शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

हे पुर्ण कुटूंब घेतंय लखपती भिकाऱ्याचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 18:35 IST

या भिकाऱ्याचं सापडणं त्या कुटूंबासाठी फार महत्त्वाचं झालं आहे आणि सर्व त्याचा कसून शोध घेत आहेत.

ठळक मुद्देउत्तराखंडमधील हरिद्वारच्या रानीपूर कोतवाली इथं हा प्रकार घडलाय. या इसमाने त्याच्या वडिलांना न विचारता परस्पर ही गादी दिल्याने खूप मोठा घोळ झाला. हा प्रकार समोर आल्यावर लगेच हे कुटुंब त्या मंदिरात गेले ज्या ठिकाणी तो भिकारी बसलेला असायचा.

हरिद्वार -  नशिबात असेल तर एखादा भिकारी एका रात्रीत लखपती बनू शकतो. यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर हरिद्वारमध्ये घडलेली घटना तुम्ही ऐेकायलाच हवी. हरिद्वार येथे एक भिकारी एका रात्रीत तब्बल ४० लाखांचा मालक बनलाय. यासाठी त्याने खूप परिश्रम केले वगैरे अशातला भाग नाही किंवा त्याला लॉटरी लागली आहे, अशातलाही भाग नाही. पण तरीही तो लखपती बनला आहे.

आणखी वाचा - पोलिसांना पुशअप्स मारताना पाहून कुत्र्यालाही राहवलं नाही

उत्तराखंडमधील हरिद्वारच्या रानीपूर कोतवाली इथं हा चमत्कार घडलाय. इथल्या एका इसमाने कनखल येथील एका भजन मंदिराबाहेर बसलेल्या एका भिकाऱ्याला एक जुनी गादी देऊ केली. या इसमाने त्याच्या वडिलांना न विचारता परस्पर ही गादी दिल्याने खूप मोठा घोळ झाला. या गादीमध्ये तब्बल ४० लाख होते. आपल्या आयुष्याची जमापूंजी साठवून त्यांनी या गादीत हे पैसे लपवून ठेवले होते. मात्र त्यांच्या मुलाने जुनी गादी समजून ती गादी भिकाऱ्याला देऊ केली. त्यामुळे साहजिकच हे कुटुंब आता त्या भिकाऱ्याच्या शोधात आहे. हा प्रकार समोर आल्यावर लगेच हे कुटुंब त्या मंदिरात गेले ज्या ठिकाणी तो भिकारी बसलेला असायचा. मात्र ते त्या भिकाऱ्याच्या शोधात तिथे गेले असता त्यांना तो तिथे सापडला नाही. त्यांनी त्या परिसरात त्याला जंग-जंग पछाडलं. सगळीकडे चौकशी केली, मात्र तो काही सापडला नाही.

आणखी वाचा - अजब ! फुलांचं नुकसान केल्याने पोलिसांनी गाढवांनाच केली अटक, चार दिवस कारागृहात ठेवलं डांबून

शेवटी तीन दिवसांनंतर तिथे तो भिकारी अखेर सापडला. आता आपले ४० लाख परत मिळणार या आशेने ते कुटुंब त्या भिकाऱ्याकडे गेलं. पण त्यांचा तिथं पुन्हा हिरमोड झाला. त्या भिकाऱ्याने ती गादी काही रुपयांत दुसऱ्या भिकाऱ्याला विकली होती. झाली की नाही पंचाईत. आता हे कुटुंब त्या दुसऱ्या भिकाऱ्याच्या शोधात आहे. याविषयी त्यांनी पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलिसांनाही या भिकाऱ्याबद्दल काहीच माहित नाही. त्यामुळे आता ४०लाखासाठी त्या नव्या भिकाऱ्याला शोधण्याचं खूप मोठं आव्हान या कुटुंबाकडे आहे. पण ज्या इसमाला हे ४० लाख सापडले आहेत, त्या इसमाचं आयुष्यच नक्कीच पालटलं असेल, यात काहीच शंका नाही. आहे की नाही रंजक घटना. एका रात्रीत श्रीमंत होण्यासाठी लोक लॉटरी वगैरे काढतात. पण ध्यानीमनी नसतानाही जर कोणाला अशी लॉटरी लागली तर आश्चर्यच वाटेल ना.

सौजन्य - http://medianp.net

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयIndiaभारत