लख्वी पुन्हा ताब्यात
By Admin | Updated: December 20, 2014 03:10 IST2014-12-20T03:10:53+5:302014-12-20T03:10:53+5:30
मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा ‘मास्टरमाइंड’ झकी-उर-रहमान लख्वी यास जामीन मंजूर होण्यावरून

लख्वी पुन्हा ताब्यात
नवी दिल्ली/ इस्लामाबाद : मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा ‘मास्टरमाइंड’ झकी-उर-रहमान लख्वी यास जामीन मंजूर होण्यावरून भारतात तीव्र संताप व्यक्त होत असतानाच पाकिस्तान सरकारने शुक्रवारी सारवासारव करीत लख्वीला तीन महिन्यांसाठी पुन्हा स्थानबद्ध केले. पाक सरकारच्या या कृतीने भारताचे जराही समाधान झाले नाही व लख्वीला जामीन देण्याच्या निर्णयाचा तीव्र शब्दांत धिक्कार करणारा ठराव पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवत लोकसभेने मंजूर केला.