शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी पाकिस्तानकडून विनवण्या, एक-दोन नव्हे चारवेळा पाठवलं पत्र! पण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 16:30 IST

भारताने करार स्थगित केल्यापासून, पाकिस्तानने जलसंपदा मंत्रालयामार्फत भारत सरकारला चार पत्रं लिहून या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.

भारत सरकारने सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, त्याचा थेट परिणाम पाकिस्तानवर होत असून देश पाण्याच्या तीव्र टंचाईच्या संकटाला सामोरे जात आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानच्या अडचणींमध्ये या निर्णयामुळे भर पडली आहे.

पाकिस्तानकडून भारताला सलग चार पत्रंभारताने करार स्थगित केल्यापासून, पाकिस्तानने जलसंपदा मंत्रालयामार्फत भारत सरकारला चार पत्रं लिहून या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. या पत्रांमध्ये पाकिस्तानने वाटाघाटीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. भारताच्या जलशक्ती मंत्रालयाकडे पाठवण्यात आलेल्या या पत्रांमध्ये, रब्बी हंगामातील पीक उत्पन्न धोक्यात येण्याची भीती पाकिस्तानने व्यक्त केली आहे.

रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी स्पष्टपणे म्हटले आहे की, “रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही.” भारत सरकारने पाकिस्तानकडून सातत्याने चालणाऱ्या दहशतवादाच्या पाठबळाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने सिंधु पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

जलवाहिन्यांचा पुनर्विकास सुरूभारत सरकार सध्या पाकिस्तानकडे जाणारे पाणी देशाच्या आतल्या भागात वळवण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर काम करत आहे. यामध्ये १२ किमी लांबीचा बोगदा, १२० ते १३० किमी लांबीचे कालवे, यांचा समावेश आहे. हे पाणी हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि दिल्ली या राज्यांमध्ये वळवण्याचे नियोजन आहे. हे पाणी रावी कालवा प्रकल्प, इंदिरा गांधी कालवा, बिकानेर कालवा, आणि गँग कालवा यामार्फत या राज्यांपर्यंत नेण्याचा आराखडा तयार केला जात आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताची ठाम भूमिकाविदेशी दौऱ्यावर गेलेल्या भारतीय शिष्टमंडळांकडेही सिंधू पाणी करारासंबंधी प्रश्न विचारले गेले, त्यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिले की, “जोपर्यंत पाकिस्तान भारतात दहशतवादाला आश्रय देत राहील, तोपर्यंत या करारावर कोणतीही सहानुभूती दर्शवली जाणार नाही.”

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर