शहरं
Join us  
Trending Stories
1
एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...
2
‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा 
3
डोनाल्ड ट्रम्प यांची आर्थिक 'दादागिरी'? उदय कोटक यांनी २०२४ मध्येच केली होती भविष्यवाणी
4
केवळ एकच व्हिडीओ, अन् यूट्युबवर लावली ‘आग’, केली ९ कोटींची कमाई, नेमकं काय आहे त्यात? 
5
स्टार क्रिकेटर Jasprit Bumrah चा 'रशियन सुंदरी' सोबतचा फोटो व्हायरल; कोण आहे 'ही' तरुणी?
6
Chanakya Niti: अपमान करणाऱ्याला कसं उत्तर द्यायचं? शिका चाणक्य नीतीचे 'हे' ५ वाग्बाण 
7
मोठा निष्काळजीपणा! नर्सने कापला दीड महिन्याच्या बाळाचा अंगठा, नेमकं काय घडलं?
8
० ० ० ० ० ० ... ६ चेंडूत हव्या होत्या ६ धावा... महाराष्ट्राचा 'जादूगार' रामकृष्णने जिंकवली मॅच
9
तुमचा iPhone हॅक तर झाला नाही ना? 'या' ४ गोष्टी दिसताच समजा कुणीतरी करतंय तुमची हेरगिरी
10
इराणच्या 'या' निर्णयाचा भारताला मोठा फटका, 2000 कोटी रुपयांवर आडलं घोडं...! काय आहे संपूर्ण प्रकरण?
11
भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा; मैदानावरच फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
12
Malegaon Municipal Election 2026 : भाजपच्या दोन बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी, वरिष्ठांच्या आदेशान्वये कारवाई
13
अपघातग्रस्ताला 1.5 लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार; मोदी सरकार आणतेय नवीन योजना
14
Share Market Down: शेअर बाजारात ५०० अंकांपेक्षा अधिक घसरण, निफ्टीबी २५,८०० च्या खाली; 'ही' आहेत ५ कारणं
15
अर्थसंकल्पापूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होऊ शकते वाढ; काय म्हटलंय नव्या रिपोर्टमध्ये
16
Ritual: सावधान! तुम्हीही मंदिरात मूर्तीच्या मागच्या बाजूला डोकं टेकवता का? आधी 'हे' वाचा
17
काळाचा घाला! MBBS विद्यार्थ्यासोबत आक्रित घडलं, नेपाळमध्ये मृत्यूने गाठलं; १० मार्चला होतं लग्न
18
२० रुपयांच्या पाण्याच्या बाटलीचे ५५ रुपये लावले; ग्राहकाने रेस्टॉरंट मालकाला शिकवला धडा
19
एक दिवसाच्या दूध-ब्रेडपेक्षाही स्वस्त आहे 'या' देशात सोनं; एका ग्रॅमसाठी मोजावे लागतात अवघे इतके रुपये!
20
"शशांकने एवढा तमाशा करायला नको होता...", मंदार देवस्थळींच्या वादात अभिनेत्रीच्या नवऱ्याची उडी, म्हणाला- "माझ्या बायकोचेही ३.५० लाख..."
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 20:07 IST

बलूचिस्तान गणराज्यात कायदा आणि सुव्यवस्थेनुसार, ही अटकेची कारवाई बलूचिस्तानच्या कुठल्याही हवाई तळावर त्यांच्या आगमन किंवा प्रस्थानावेळी होऊ शकते असं वॉरंटमध्ये म्हटलं आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानात पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याविरोधात त्यांच्याच देशात अटकेचे वॉरंट जारी करण्यात आले आहे. हे वॉरंट पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतातील बंडखोर सरकारने जारी केले आहे. त्यात शहबाज शरीफ यांच्यावर बलूचिस्तानातील व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप लावला आहे. बलूचिस्तानच्या सार्वभौमत्वाला गंभीर आणि जाणुनबुजून नुकसान पोहचवल्याचा आरोप आहे. शहबाज शरीफ यांच्या अटकेच्या वॉरंटची घोषणा मीर यार बलोच यांनी केली आहे. जे सोशल मीडियावर बलूचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढत असतात आणि पाकिस्तानी सैन्यावर कायम टीका करत राहतात.

बलोच यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात बलूचिस्तान गणराज्यातील व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवत पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याविरोधात अटकेचे वॉरंट जारी केली आहे. ८ जानेवारी २०२६ रोजी जारी या आदेशानुसार, पाकिस्तानी पंतप्रधान बलूचिस्तानच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला नुकसान पोहचवत आहेत. त्यासाठी त्यांना अटक केली जाऊ शकते. विना व्हिसा बेकायदेशीर प्रवेश केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. बलूचिस्तान गणराज्यात कायदा आणि सुव्यवस्थेनुसार, ही अटकेची कारवाई बलूचिस्तानच्या कुठल्याही हवाई तळावर त्यांच्या आगमन किंवा प्रस्थानावेळी होऊ शकते असं वॉरंटमध्ये म्हटलं आहे.

बलूचिस्तानला स्वतंत्र देशाचा दर्जा

बलूचिस्तानचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांनी व्हिसा नसताना बलूचिस्तानात प्रवेश केला तर त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल. हे कृत्य बलूचिस्तानमधील प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन ठरेल. त्याशिवाय हवाई क्षेत्रावर बेकायदेशीर अतिक्रमण आहे. बलूचिस्तान या गोष्टीचा स्पष्ट शब्दात विरोध करते. बलूचिस्तान एक विशिष्ट स्वतंत्र देश आहे. कुणीही व्यक्ती असेल, मग त्याचे पद अथवा प्रतिष्ठा काहीही असेल त्याला बलूचिस्तानच्या कायद्यातून सूट नाही. योग्य कागदपत्रे  आणि अधिकृतपणे व्हिसा न घेता बलूचिस्तानमध्ये प्रवेश करणे कायदेशीर गुन्हा आहे असं वॉरंटमध्ये लिहिले आहे.

हे वॉरंट पाकिस्तानचे पंतप्रधान, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि सर्व पाकिस्तानी अधिकारी, नागरिकांना अंतिम आणि औपचारिक इशारा आहे. बलुचिस्तान प्रजासत्ताकाने जारी केलेल्या पूर्व व्हिसा मंजुरीशिवाय बलूचिस्तानमध्ये भविष्यात कोणताही प्रवेश सहन केला जाणार नाही. वैध बलुचिस्तान व्हिसा किंवा अधिकृत इमिग्रेशन क्लिअरन्सशिवाय बलूचिस्तानमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणारा कोणताही पाकिस्तानी नागरिक पकडला गेला तर त्याला बलूचिस्तान प्रजासत्ताकाच्या कायद्यांनुसार कठोर खटला आणि शिक्षेला सामोरे जावे लागेल, त्याला जबरदस्तीने पाकिस्तानात पाठवले जाऊ शकते असं सांगण्यात आले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan in turmoil: Arrest warrant issued for PM Shehbaz Sharif?

Web Summary : An arrest warrant has been issued for Pakistani PM Shehbaz Sharif by Balochistan's separatist government for allegedly violating visa rules and undermining Balochistan's sovereignty. The warrant threatens arrest upon arrival or departure from any Balochistan airport.
टॅग्स :Pakistanपाकिस्तान