शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

धक्कादायक! "कोरोनाचे पुढील केंद्र होऊ शकते आफ्रिका, तीन लाखहून अधिक लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 22:27 IST

आफ्रिका कोरोना व्हायरसचे पुढील केंद्र होऊ शकते, असा इशारा जागतीक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) दिला आहे. गेल्या आठवड्यात येथे कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढली आहे. आतापर्यंत तेथे 1,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देसंयुक्त राष्ट्र आर्थिक आयोगाच्या एका अहवालात ही शक्यता वर्तवण्यात आली आहेआतापर्यंत तेथे 1,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहेआफ्रिकेत आतापर्यंत 18 हजारहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे

जोहान्सबर्ग  : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार घातला आहे. आतापर्यंत कोरोनाने एक लाखहून अधिक जणांचा बळी घेतला आहे. अशातच, संयुक्त राष्ट्र आर्थिक आयोगाच्या एका अहवालात, आफ्रिकेत कोरोना व्हायरसमुळे तब्बल 3 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, अशी धक्कादायक शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही शक्यता वर्तवताना, परिस्थिती सर्वसाधारण राहिल्यास तीन लाख लोकांचा अन्यथा परिस्थिती बिघडली आणि व्हायरसला रोखण्यात हस्तक्षेप केला गेला नाही, तर तब्बल 33 लाख लोकांचा येथे मृत्यू होऊ शकतो. तसेच 120 कोटी लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते, असे या अहवालात म्हणण्यात आले आहे. आफ्रिका कोरोना व्हायरसचे पुढील केंद्र होऊ शकते, असा इशारा जागतीक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) दिला आहे. गेल्या आठवड्यात येथे कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढली आहे. आतापर्यंत तेथे 1,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर 18 हजारहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसे पाहिल्यास हा आकडा अमेरिका आणि यूरोपच्या तुलनेत फार कमी आहे. मात्र, डब्ल्यूएचओचे आफ्रिका विभागाचे संचालक मत्सिदिसो मोइती यांच्यामते, कोरोना व्हायरस दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, आइवरी कोस्ट, कॅमरून आणि घाना येथे राजधानी शहरांपासून दूर असलेल्या भागांतही वेगने पसरत आहे.

जगात सर्वाधिक वाईट स्थिती अमेरिकेची - अमेरिकेत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत अमेरिकेत विक्रमी मृत्यू झाले आहेत. येथे 24 तासांत कोरोनामुळे तब्बल 4,491 जणांचा मृत्यू झाला आसून  मृतांचा आकडा गुरुवारी 32,917 वर पोहोचला. जगात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. मात्र, अमेरिकेत गुरुवारी 2257 जणांचाच कोरोनामुळे मृत्यू झाला, असे सीएनएनने म्हटले आहे.

सीएनएनने जाहीर केलेले आकडे हे रुग्णालयात झालेल्या मृत्यूंचे आहेत. तर एएफपी या वृत्त संस्थेने मृतांच्या आकड्यांमध्ये अशांचाही समावेश केला आहे, ज्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे, या दोघांच्या आकड्यांमध्ये तफावत दिसून येत आहे. अमेरिकेत आतापर्यंत एकूण 6,67,800 हून अधिक जणांचा कोरोनाची लागण झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSouth Africaद. आफ्रिकाAmericaअमेरिकाWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना