शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

भारतातील धार्मिक स्वातंत्र्यांची स्थिती खराब, ट्रम्प यांच्या दौऱ्यापूर्वी अमेरिकन संस्थेचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 1:02 PM

USCIRF reports : आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासंबंधी अमेरिकी आयोगाने आपला अहवाल प्रसिद्ध केला असून, त्यात भारताचा समावेश चिंतनीय स्थिती असलेल्या देशांच्या यादीत केला आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यासाठी सध्या जोरदार तयारी सुरू आहे. मात्र अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यापूर्वी एका अमेरिकी संस्थेच्या अहवालाने भारत सरकारच्या चिंतेत भर टाकली आहे. आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासंबंधी अमेरिकी आयोगाने आपला अहवाल प्रसिद्ध केला असून, भारतात धार्मिक शोषणाचे प्रमाण वाढले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. तसेच नागरिकत्व कायद्याबाबतही या अहवालात चिंता व्यक्त कऱण्यात आली आहे. अमेरिकन संस्थेने या अहवालामध्ये भारताचा समावेश विशेष चिंतनीय स्थिती असलेल्या देशांच्या यादीत टीयर-2 मध्ये केला आहे.  2018 नंतर भारतात धार्मिक शोषणाचे प्रकार वाढले आहेत. काही राज्यांत धार्मिक स्वातंत्र्याची परिस्थिती बिघडल्याचे दिसत आहे. मात्र तेथील सरकारांकडून ल्याला आळा घालण्यासाठी आवश्यत ती पावले उचलली जात असल्याचे दिसत नाही आहे, असे आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासंबंधी अमेरिकी आयोगाच्या अहवालात म्हटले आहे. 

संबंधित बातम्या

'मी येतोय, पण आता नाही नंतर करणार भारताशी मोठा व्यापार'

ट्रम्प यांना भारत भेटीचा फायदा होईल?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावरपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून धार्मिक तणाव कमी करण्यासाठी आवश्यक असे कुठलेही वक्तव्य करण्यात आलेले नाही. तसेच त्यांच्या पक्षातील काही सदस्यांचा कट्टरवादी संघटनांशी संबंध आहे. या नेत्यांनीच भावना भडकवणाऱ्या भाषेचा वापर केला आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालामधून अमेरिकी सरकारने भारत सरकाकडे काही शिफारसी केल्या आहेत. त्यामध्ये प्रक्षोभक भाषणे देणाऱ्यांना सक्त ताकीद द्यावी, अशा व्यक्तींविरोधात कारवाईसाठी पोलिसांना सक्षम बनवावे आणि धार्मिक स्थळांची सुरक्षा वाढवावी.'' या शिफारशींचा समावेश आहे. 

दरम्यान, सध्या देशात कळीचा विषय ठरलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबतही या अहवालामधून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या कायद्यामुळे देशातील एका मोठ्या वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे. मोदी सरकारच्या काळात  धार्मिक शोषणाच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यावरून मोट्या प्रमाणावर चर्चाही झाली आहे. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यापूर्वी अशा प्रकारच्या अहवालाने सरकारची चिंता वाढली आहे. आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासंबंधी अमेरिकी आयोग ही संस्था जगभरातील धार्मिक बाबींबाबत आपला अहवाल तयार करत असते. तसेच हा अहवाल ही संस्था थेटपणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेची संसद आणि अमेरिकी सिनेटला सादर करत असते.   

टॅग्स :IndiaभारतUnited StatesअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प