शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
4
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
5
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
6
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
7
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
8
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
9
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
10
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
11
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
12
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
13
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
14
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
15
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
16
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
17
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
18
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
19
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
20
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!

भारतीयांना मोठा दिलासा; ट्रम्प काळातील 'तो' नियम रद्द करण्याची जो बायडेन प्रशासनाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 09:57 IST

एच-वन बीसाठी पात्रतेचा ट्रम्प काळातील नियम रद्द

वॉशिंग्टन : अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातील एच-वन बीसाठी पात्र ठरण्याचा नियम काढून टाकण्यात आल्याची घोषणा अध्यक्ष जो बायडेन प्रशासनाने मंगळवारी केली. अमेरिकेत एच-वन बी नॉन इमिग्रेशन शॉर्ट टर्म वर्क व्हिसाला पात्र होण्यासाठी ‘स्पेशालिटी’ची व्याख्या ट्रम्प प्रशासनाने खूप छोटी केली होती. बायडेन प्रशासनाने केलेल्या ताज्या घोषणेमुळे ट्रम्प प्रशासनाने व्हिसा कार्यक्रमासाठी केलेल्या बंधनकारक बदलातील आणखी एक बदल दूर झाला आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ट्रम्प प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार अमेरिकन कंपन्या व्हिसा कार्यक्रमाचा उपयोग ‘खऱ्या कर्मचाऱ्यांना’ ‘खऱ्या ऑफर्स’ देऊ शकतील, यासाठी स्पेशालिटी ऑक्युपेशनची व्याख्या अगदी छोटी केली गेली. अमेरिकन कंपन्यांना पात्र (क्वॉलिफाईड) अमेरिकन्सऐवजी कमी वेतनावर विदेशींना काम देता येऊ नये, असा तो आदेश होता. त्या नियमानुसार फक्त पदवी ही पुरेशी नव्हती, त्याऐवजी संबंधित कामासाठी विशिष्ट शाखेत पदवी आवश्यक ठरविली गेली होती. या नियमाची अंमलबजावणी केली जाऊ शकली नाही, कारण तो न्यायालयाने रद्द केला होता. आता होमलँड सिक्युरिटी विभागाने कोड ऑफ फेडरल रुल्समधून पूर्णपणे काढून टाकला आहे. ‘एच-वन बी व्यवस्था पुन्हा घडविण्यासाठी ट्रम्प यांनी मध्यरात्री ज्या तीन गाेष्टी केल्या त्यातील ही एक होती’, असे ओबामा प्रशासनातील इमिग्रेशन अधिकारी डो रँड गेल्या ऑक्टोबरमध्ये ट्विटरवर म्हणाले होते. रँड म्हणतात की, ‘ट्रम्प कारकिर्दीतील इमिग्रेशन नियमांबाबत बायडेन प्रशासनाची सतत विचारी भूमिका आहे. खटल्यांची संख्या वाढतच आहे. ट्रम्प कारकिर्दीतील इतर एच-वन बी नियमही असेच नाहीसे होताना आम्ही कदाचित बघू.’

दरवर्षी होतात ८५ हजार व्हिसा मंजूरअमेरिका दरवर्षी अमेरिकन कंपन्यांना क्वाॅलिफाईड कर्मचाऱ्यांची टंचाई दूर करण्यासाठी विदेशी कर्मचारी घेता यावेत म्हणून ८५ हजार एच-वन बी व्हिसा मंजूर करते. व्हिसांपैकी ७० टक्क्यांपेक्षा जास्त हे भारतातून आणलेले व्यावसायिक किंवा फेसबुक, गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या अमेरिकन कंपन्यांच्या शाळा आणि महाविद्यालयातील तसेच टीसीएस, विप्रो आणि इन्फोसिससारख्या भारतीय कंपन्यांच्या सहयोगी अमेरिकन कंपन्यातील व्यावसायिकांकडे जातात.

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतAmericaअमेरिका