तेलाच्या घसरत्या किमतीला दिलासा
By Admin | Updated: January 28, 2015 05:49 IST2015-01-28T05:49:26+5:302015-01-28T05:49:26+5:30
तब्बल सहा वर्षांचा घसरता कल बघता मंगळवारी त्याची किंमत किंचित वधारली; परंतु कमी मागणी,

तेलाच्या घसरत्या किमतीला दिलासा
सिंगापूर : तब्बल सहा वर्षांचा घसरता कल बघता मंगळवारी त्याची किंमत किंचित वधारली; परंतु कमी मागणी, ग्रीसमधील राजकीय अस्थिरता आणि वाजवीपेक्षा जास्त पुरवठ्यामुळे हा दिलासा फार समाधानकारक ठरला नाही.
अमेरिकेची प्रसिद्ध तेल उत्पादक कंपनी वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटला (डब्ल्यूटीआय) सकाळच्या सत्रात मार्चमधील पुरवठ्यासाठी १० सेंटस्ची वाढ मिळून ते ४५.२५ अमेरिकन डॉलर झाले, तर ब्रेंट क्रूड तेल १४ सेंटस्ने वाढून ४८.३० अमेरिकन डॉलरवर गेले.
डब्ल्यूटीआय सोमवारी ४४ सेंटस्ने घसरून ४५.१५ अमेरिकन डॉलरवर आले होते, तर ब्रेंट क्रूड ६३ सेंटस्ने घसरून ४८.१६ अमेरिकन डॉलरवर आले होते. २००९ नंतरचा हा नीचांक होता. गेल्या वर्षी जूनपासून तेलाच्या किमतीत तब्बल निम्म्याने घट झालेली आहे.