अमेरिका-ब्रिटनचा हुथी दहशतवाद्यांवर येमेनमध्ये एअरस्ट्राइक; संयुक्त हल्ल्यात ११ ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 11:52 AM2024-03-12T11:52:29+5:302024-03-12T11:54:17+5:30

हुथींनी केलेल्या हल्ल्यात ३ जण ठार झाल्यानंतर करण्यात आला प्रतिहल्ला

Red sea war america britain combine airstrikes kill 11 terrorist in yemen houthi | अमेरिका-ब्रिटनचा हुथी दहशतवाद्यांवर येमेनमध्ये एअरस्ट्राइक; संयुक्त हल्ल्यात ११ ठार

अमेरिका-ब्रिटनचा हुथी दहशतवाद्यांवर येमेनमध्ये एअरस्ट्राइक; संयुक्त हल्ल्यात ११ ठार

America Britain Airstrike Houthi Yemen Red Sea: लाल समुद्रातील मालवाहू जहाजांना सतत लक्ष्य करणाऱ्या हुथींविरुद्ध अमेरिका आणि ब्रिटनने मोठी कारवाई केली आहे. सोमवारी, यूएस-ब्रिटिश सैन्याने पश्चिम येमेनमधील बंदरे आणि लहान शहरांवर हवाई हल्ले केले, त्यात ११ लोक ठार आणि १४ जखमी झाले. हुथी मीडिया आउटलेट अल मसिराहच्या म्हणण्यानुसार, यूएस-ब्रिटिश सैन्याने येमेनमध्ये होडेदाह शहर आणि रास इसा बंदरासह सुमारे १७ हवाई हल्ले केले.

हुथी हल्ल्यात ३ नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि एक जहाज बुडाले होते. त्यानंतर काही दिवसांतच हा हल्ला झाला. गाझा हल्ल्यांच्या निषेधार्थ लाल समुद्रात हौथींनी हल्ले सुरू केल्यापासून तो पहिलाच हल्ला होता, ज्यात ३ नागरिकांचा मृत्यू झाला होता. अमेरिका आणि ब्रिटनच्या कारवाईनंतरही, हुथी त्यांचे हल्ले सुरूच ठेवत आहेत. त्यामुळे असे हवाई हल्ले हुथींना रोखण्यात यशस्वी होतील की नाही हे सांगणे कठीण आहे.

मंगळवारी सकाळी येमेनी टेलिव्हिजनवर हौथी प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनानुसार, लाल समुद्रात अमेरिकन जहाज (पिनोचिओ) ला क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले गेले. IMO नुसार, Pinocchio हे सिंगापूर-नोंदणीकृत कंपनी Om-March 5 Inc च्या मालकीचे लायबेरिया-ध्वज असलेले कंटेनर जहाज आहे.

दरम्यान, गेल्या बुधवारी एडन बंदरावर हुथींच्या हल्ल्यात तीन जण ठार झाले. बार्बाडोस जहाजावरील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले तिन्ही नागरिक ग्रीक होते. यापूर्वी, रुबीमार या मालवाहू जहाजाला १८ फेब्रुवारीला हुथी क्षेपणास्त्राने धडक दिली होती आणि दोन आठवड्यांनंतर ते लाल समुद्रात बुडाले होते. एडनचे आखात आणि लाल समुद्रातून सुएझ कालव्याकडे जाण्यासाठी अनेक जहाजे आता या मार्गाचा वापर आता टाळतात. हे टाळण्यासाठी तो आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपमधून जात आहेत. त्यामुळे शिपिंग खर्च झपाट्याने वाढत आहे आणि त्याचा परिणाम जगातील अनेक देशांमध्ये दिसून येत आहे.

Web Title: Red sea war america britain combine airstrikes kill 11 terrorist in yemen houthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.