सर्वांत वृद्ध नाताळसाठी सज्ज

By Admin | Updated: December 22, 2014 02:56 IST2014-12-22T02:56:51+5:302014-12-22T02:56:51+5:30

युरोपातील सर्वांत वृद्ध नजर सिंग यंदा आपला १११ वा नाताळ साजरा करण्यासाठी सज्ज आहेत. पंजाबमध्ये जन्मलेले नजर सिंग सुरुवातीला मजुरीची कामे करीत असत.

Ready for the oldest Christmas | सर्वांत वृद्ध नाताळसाठी सज्ज

सर्वांत वृद्ध नाताळसाठी सज्ज

लंडन : युरोपातील सर्वांत वृद्ध नजर सिंग यंदा आपला १११ वा नाताळ साजरा करण्यासाठी सज्ज आहेत. पंजाबमध्ये जन्मलेले नजर सिंग सुरुवातीला मजुरीची कामे करीत असत.
११० वर्षांचे नजर सिंग १९६५ मध्ये इंग्लंडला आले आणि त्यानंतरच त्यांना ख्रिसमसची माहिती मिळाली. नजर सिंग म्हणाले, ‘इंग्लंडमध्ये आल्यानंतर मला भेट स्वीकारण्यात व देण्यात मोठा अभिमान वाटू लागला. आता माझ्याकडे मागण्यासाठी काहीही शिल्लक नाही.’ तथापि, ते आपली सर्व ९ मुले, ३४ नाती-नातू आणि ६३ पणतू-पणती यांना भेटू शकणार नाहीत. इंग्लंडमधील सुंदरलँड येथील आपल्या ६१ वर्षीय मुलासोबत राहतात. ‘आम्ही वडिलांसाठी ऊबदार कपड्यांची आणि व्हिस्कीही खरेदी करतो. आम्ही त्यांना कधीच विसरू शकत नाही,’ अशा शब्दांत चैनसिंग यांनी भावना व्यक्त केल्या. (वृत्तसंस्था)
 

Web Title: Ready for the oldest Christmas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.