रावणाची बहीण आजही जिवंत ?

By Admin | Updated: June 25, 2017 00:23 IST2017-06-25T00:23:01+5:302017-06-25T00:23:01+5:30

रावणाची बहीण शुर्पणखा आपल्या सर्वांना माहीत आहे. रावणाच्या मृत्यूनंतर वनवासात जाऊन तपश्चर्येद्वारे तिने मुक्ती मिळविली, असे म्हटले जाते

Ravana's sister still alive? | रावणाची बहीण आजही जिवंत ?

रावणाची बहीण आजही जिवंत ?

कोलंबो : रावणाची बहीण शुर्पणखा आपल्या सर्वांना माहीत आहे. रावणाच्या मृत्यूनंतर वनवासात जाऊन तपश्चर्येद्वारे तिने मुक्ती मिळविली, असे म्हटले जाते; मात्र यानंतर तिचा कुठेही उल्लेख आढळत नाही. आता श्रीलंकेतील एका महिलेने आपण शुर्पणखाचा अवतार असल्याचा दावा केला आहे. या महिलेचे नाव गंगा सुदर्शनी आहे. आपल्याजवळ दिव्यशक्ती असून त्यामुळे भविष्यात होणाऱ्या घटना आपल्याला आधीच कळतात, असा ती दावा करते. गंगा सुदर्शनीचा जन्म कोलंबोपासून २०० कि. मी. अंतरावरील महियांग्रा या गावात झाला होता. रामायणात वर्णन असल्याप्रमाणेच तिच्या नाकावर जखमेचा व्रण असून कान तुटलेले आहेत. तिच्याकडे दररोज लोकांची रांग लागलेली असते. ती लोकांवर उपचार करते. गंगाकडे दैवीशक्ती असून, तिच्या केवळ स्पर्शाने आजार बरे होतात, असे लोकांचे म्हणणे आहे. ती लोकांसमोर पाऊस पाडते आणि तो थांबवतेही. मोठमोठे लोक तिचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. सरकारकडून तिला पेन्शनही दिले जाते. २००४ मध्ये श्रीलंकेत आलेल्या त्सुनामीपूर्वी तिने या संकटाची आधीच भविष्यवाणी केली होती. गंगा रावणाची बहीण शुर्पणखा असल्याचे सिद्ध करणाऱ्या अनेक खाणाखुणा तिच्या शरीरावर असल्याचे लोक म्हणतात.

Web Title: Ravana's sister still alive?