रॅटल स्नेकसोबती सेल्फी पडली महागात
By Admin | Updated: July 26, 2015 19:04 IST2015-07-26T18:36:13+5:302015-07-26T19:04:23+5:30
स्मार्टफोनमुळे सेल्फी काढण्याची सवय दिवसेगणिक वाढत असून या सेल्फीच्या नादात अमेरिकेतील एका व्यक्तीला तब्बल दिड लाख डॉलर्सचा फटका बसला आहे.

रॅटल स्नेकसोबती सेल्फी पडली महागात
>ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. २६ - स्मार्टफोनमुळे सेल्फी काढण्याची सवय दिवसेगणिक वाढत असून या सेल्फीच्या नादात अमेरिकेतील एका व्यक्तीला तब्बल दिड लाख डॉलर्सचा फटका बसला आहे. सेल्फी काढताना विषारी सापाने दंश केल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले असून उपचारासाठी त्याला तब्बल दिड लाख डॉलर्स (सुमारे एक कोटी रुपये) खर्च करावे लागले.
अमेरिकेतील सेन डिएगो येथे राहणारे टॉड फॅसलर यांना रॅटल स्नेकसोबत (खडखड्या साप) सेल्फी काढायची होती. रॅटल स्नेक हा जगातील सर्वात विषारी साप म्हणून ओळखळा जातो. या रॅटल स्नेक सोबत सेल्फी काढताना टॉड फॅसलर यांना सापाने दंश केले. रॅटल स्नेकचे विष त्यांच्या शरीरात वेगाने पसरल्याने त्याची प्रकृती खालावली. माझे संपूर्ण शऱीर थरथरत होते, त्या सापाने माझी स्थिती लकव्या मारल्यासारखी केली. माझी जीभ बाहेर आली होती अशी आठवण फॅसलर सांगतात. फॅसलर या दुर्घटनेतून बचावले असले तरी त्यांचा डावा हात सापाच्या दंशामुळे अक्षरशः जांभळा पडला आहे. मात्र या उपचारांसाठी फॅसलरला तब्बल दिड लाख डॉलर्स ऐवढा खर्च आला आहे. आता हा खर्च फॅसलर स्वतः देणार की विमा कंपनी हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.