डेटींग साईटचा गैरफायदा घेऊन केला 5 जणींवर बलात्कार

By Admin | Updated: February 17, 2016 14:25 IST2016-02-17T13:41:27+5:302016-02-17T14:25:04+5:30

युकेमध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी मॅच.कॉम या वेबसाईटचा गैरफायदा घेत 5 जणींवर बलात्कार

Rape of 5 women by taking advantage of dating site | डेटींग साईटचा गैरफायदा घेऊन केला 5 जणींवर बलात्कार

डेटींग साईटचा गैरफायदा घेऊन केला 5 जणींवर बलात्कार

ऑनलाइन लोकमत 
लंडन, दि. 17 - डेटिंग साईटचा गैरफायदा घेऊन  5 महिलांवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. युकेमध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी मॅच.कॉम या वेबसाईटचा गैरफायदा घेत हे कृत्य करण्यात आलं आहे. एका पिडीत महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. 
द इंडिपेंडंटने दिलेल्या वृत्तानुसार जेसन लॉरेन्स याने मॅच.कॉम या डेटिंग वेबसाईटच्या सहाय्याने या महिलांशी मैत्री केली आणि त्यानंतर त्यांना भेटण्याच्या बहाण्याने बोलवून त्यांच्यावर बलात्कार केला. जेसन लॉरेन्स याने अजून एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा तसंच दुस-या महिलेवर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. 
जेसन लॉरेन्सने वेबसाईटवर 2 प्रोफाईल बनवले होते, ज्यामधून तो महिलांना आपल्याला मेसेज किंवा ईमेल पाठवून संपर्क करण्याची विनंती करायचा. ज्या महिला त्याच्याशी संपर्क साधायच्या त्यांच्याशी मैत्री करुन नंतर तो त्यांना भेटायला बोलवायचा आणि संधी साधून बलात्कार करायचा. 
जेसन लॉरेन्सने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. पोलिसांनी जेसन लॉरेन्सला अटक केली असून न्यायालयात त्याच्यावर सुनावणी सुरु आहे.

 

Web Title: Rape of 5 women by taking advantage of dating site